हायमास्ट बसविण्यासाठी स्पर्धा स्मार्ट सिटी: वीज बचतीचा बोजवारा
By admin | Updated: August 20, 2015 22:09 IST
सोलापूर : स्मार्ट सिटी योजनेसाठी शिफारस झाल्यावर अनेकांनी सोलापूर स्मार्ट बनण्यासाठी काय करता येईल, यावर विचार सुरू केला आहे. उपमहापौर प्रवीण डोंगरे यांनी कार्यालयात एलईडी दिवे बसविले तर नगरसेवक चेतन नरोटे यांनी सामाजिक संस्थेच्या सहकार्यातून वॉर्ड स्मार्ट करण्याचा संकल्प केला, मात्र दुसरीकडे हायमास्ट दिवे बसविण्यासाठी स्पर्धा लागल्याचे चित्र दिसत आहे.
हायमास्ट बसविण्यासाठी स्पर्धा स्मार्ट सिटी: वीज बचतीचा बोजवारा
सोलापूर : स्मार्ट सिटी योजनेसाठी शिफारस झाल्यावर अनेकांनी सोलापूर स्मार्ट बनण्यासाठी काय करता येईल, यावर विचार सुरू केला आहे. उपमहापौर प्रवीण डोंगरे यांनी कार्यालयात एलईडी दिवे बसविले तर नगरसेवक चेतन नरोटे यांनी सामाजिक संस्थेच्या सहकार्यातून वॉर्ड स्मार्ट करण्याचा संकल्प केला, मात्र दुसरीकडे हायमास्ट दिवे बसविण्यासाठी स्पर्धा लागल्याचे चित्र दिसत आहे. महापौर सुशीला आबुटे यांच्या प्रभागात आयटीआय पोलीस चौकी व नेहरूनगर येथे महामार्गाच्या मधोमध हायमास्ट दिवे बसविण्यासाठी खड्डे खोदून खांब उभे केले आहेत. विभागीय कार्यालयाने परस्पर हे काम हाती घेतले आहे. वीज विभागाला हायमास्ट दिवे उभारण्याच्या कामाची माहिती नसल्याचे सांगण्यात आले. विभागीय अधिकार्यांना दिलेल्या अधिकारात अशी कामे करून चार महिन्यांनंतर अहवाल सादर केला जातो. पण महामार्गावर असे दिवे बसविताना वीज विभागाची तांत्रिक मान्यता, प्रस्ताव, नियोजन व इस्टिमेट सादर करणे आवश्यक आहे. पण या नियमाला मूठमाती देऊन असे दिवे बसविण्याचा घाट घातला जात आहे. अशा अनेक दिव्यांचे प्रस्ताव विभागीय कार्यालयाकडे आहेत. एकीकडे स्मार्ट सिटी करण्यासाठी वीज बचतीसाठी एलईडी दिव्याचा 32 कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे तर दुसरीकडे हायमास्ट दिवे बसविण्याचे काम वेगाने सुरू आहे. यातून मोठय़ा वीज बिलावर पैशाचा चुराडा होत आहे.इन्फो..अशी आहे दिव्यांची स्थितीहायमास्ट छोटे: 138हायमास्ट मोठे: 79ट्युबलाईट: 10 हजारहॅलोजन दिवे: 30 हजारमासिक बिल: 85 लाख इन्फो..रात्रीला 385 रु. बिलहायमास्ट दिवे दोन प्रकारचे आहेत. छोट्या हायमास्टच्या पोलची उंची 10 मीटर असते व त्यावर 4 हॅलोजन असतात. मोठय़ा हायमास्टमध्ये 12 मीटर उंचीचा पोल (दिवे: 8), 16 मीटर (दिवे: 12), 20 मीटर (दिवे: 12) असे प्रकार आहेत. 12 दिव्यांसाठी एका रात्रीत 385 रुपयांचे वीज बिल येते. वीज बचतीसाठी एलईडी दिव्यांचा प्रस्ताव आहे. पण अनेक जण या प्रस्तावाला न जुमानता वजन वापरून हायमास्टवर भर देत असल्याचे दिसून आले आहे.कोट..वीज बचतीसाठी एलईडी दिवे उपयुक्त आहेत. प्रत्येकाने स्वत:पासून सुरूवात करावी म्हणून मी माझ्या कार्यालयात स्वखर्चाने असे दिवे बसवून काटकसर केली आहे. हायमास्टवर अशा दिव्यांची योजना करता येणे शक्य आहे.प्रवीण डोंगरे, उपमहापौर