शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

भरपाई हा कोरोना मृतांच्या नातेवाइकांचा अधिकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 07:35 IST

उच्च न्यायालय : पोस्टाद्वारे व प्रत्यक्षात येणारे अर्जही स्वीकारण्याची मागणी

ठळक मुद्देभरपाईसाठी दावा करणारे बहुतांश लोक हे गरीब आहेत. त्यांना ऑनलाइन अर्जाबाबत माहिती नाही, अशी माहिती ॲड. सुमेधा राव यांनी दिली

मुंबई : कोरोना पीडितांच्या नातेवाइकांना सानुग्रह भरपाई ही हक्काची बाब आहे आणि त्यांना यापासून वंचित ठेवू शकत नाही, असे उच्च न्यायालयाने सोमवारी म्हटले. पोस्टाद्वारे किंवा प्रत्यक्षात दाखल केलेल्या नुकसानभरपाईचे दावे का फेटाळण्यात येत आहेत किंवा ते स्वीकारण्यास विलंब का करण्यात येत आहे, याबाबत सूचना घ्याव्यात, असे निर्देश मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. मकरंद कर्णिक  यांच्या खंडपीठाने  सरकारी वकिलांना दिले. नुकसानभरपाईसाठी केवळ ऑनलाइन अर्जच स्वीकारू नये, तर पोस्टाद्वारे व प्रत्यक्षात अर्ज भरणाऱ्यांचे अर्जही स्वीकारावेत, असे निर्देश राज्य सरकारला द्यावेत, अशी मागणी प्रमेय वेल्फेअर फाउंडेशन या संस्थेने जनहित याचिकेद्वारे केली आहे.  

भरपाईसाठी दावा करणारे बहुतांश लोक हे गरीब आहेत. त्यांना ऑनलाइन अर्जाबाबत माहिती नाही, अशी माहिती ॲड. सुमेधा राव यांनी दिली.त्यावर मुख्य सरकारी वकील पूर्णिमा कंथारिया यांनी न्यायालयाला सांगितले की, ऑनलाइन पोर्टलद्वारे अर्ज भरलेल्या दावेदारांना नुकसानभरपाईची रक्कम राज्य सरकारने दिली आहे. ऑनलाइन अर्जासाठी तुम्ही इतके आग्रही का? सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना आणि केंद्र सरकारला कोरोना पीडितांपर्यंत पोहोचवून सानुग्रह भरपाई देण्याचे आदेश दिले असल्याची आठवण उच्च न्यायालयाने राज्य सरकारला करून दिली. तसेच न्यायालयाने गुरुवारी या याचिकेवर सुनावणी ठेवली.

मुंबईत निम्मे अर्ज बाहेरीलमहापालिकेच्या वकिलांनी सांगितले की, पालिकेकडे आतापर्यंत ३४,००० अर्ज आले. त्यापैकी १६,८८४ अर्ज आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला पाठविण्यात आले आहेत. बाकीच्यांनी अर्ज भरण्यात काही चुका केल्या आहेत. तसेच काही अर्ज मुंबई महापालिकेबाहेर राहणाऱ्या नागरिकांचेही आहेत, त्या नागरिकांचे अर्ज संबंधित प्रशासनाकडे पाठविण्यात येत आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCourtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालय