शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कंपनी कायद्याच्या अमलात पारदर्शकता आणावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 04:41 IST

खासगी कंपन्यांमध्ये पारदर्शकतेसाठी आखलेल्या कंपनी अ‍ॅक्ट २०१३ नुसार अल्पसंख्याक भागधारकांच्या हितरक्षणासाठी स्वतंत्र संचालक नेमण्याची तरतूद आहे.

नवी दिल्ली : खासगी कंपन्यांमध्ये पारदर्शकतेसाठी आखलेल्या कंपनी अ‍ॅक्ट २०१३ नुसार अल्पसंख्याक भागधारकांच्या हितरक्षणासाठी स्वतंत्र संचालक नेमण्याची तरतूद आहे. मात्र अनेकदा प्रमोटर वा अन्य संचालकांमुळे त्याचे अस्तित्त्वच राहत नाही, असा आरोप अकोल्याचे संजय धोत्रे यांनी केला. कंपनी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सरकार घेत असलेल्या खबरदाराची माहिती त्यांनी विचारली. केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल म्हणाले की, खासगी कंपन्यांमध्ये स्वाभाविकपणे प्रमोटर्स स्वत:च्या कुटुंबीयांना संचालक नेमतात. मात्र वार्षिक प्राप्तिकर परतावा भरल्यानंतर कंपनीचा ताळेबंद 'पब्लिक डोमेन'मध्ये उपलब्ध असतो. त्यावरून कुणी तक्रार केल्यास आम्ही त्याची दखल घेऊ .>पोलीस दलात किती महिला?पोलीस दलात वरिष्ठ पदांवर अत्यंत कमी प्रमाणात महिला अधिकारी असल्याची खंत डॉ. नरेंद्र जाधव यांनी राज्यसभेत व्यक्त केली. महिलांना ३३ टक्के आरक्षण आहे. प्रत्यक्षात केवळ दहा राज्यांमध्ये त्याची अंमलबजाणी होते. पोलीस ठाण्यात तीन महिला उपनिरीक्षक व दहा महिला हवालदार असणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. गृह राज्यमंत्री हंसराज अहीर उत्तरात म्हणाले, तीनदा यासाठी मार्गदर्शिका प्रसिद्ध केली. काही राज्यांनी लगेचच धोरण आखले. अनेक राज्यांनी ३८ टक्के आरक्षण देण्याची योजना केली. महिलांना पोलीस दलात स्थान देण्याचे अधिकार राज्यघटनेच्या सातव्या सूचीनुसार राज्यांनाच आहेत.>टपाल खात्याच्या इमारती जीर्णटपाल खात्यांच्या जीर्ण झालेल्या इमारतींकडे कल्याणचे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लक्ष वेधले. डोंबिवलीत विष्णूनगरमधील टपाल कार्यालय मोडळीस आल्याचे त्यांनी सांगितले. ही इमारत कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात आहे. संबंधित मंत्रालयास २०१५ साली महापालिकेमार्फत दुरुस्तीचे पत्र दिले. मात्र मंत्रालयाने उत्तर दिले नाही. हे कार्यालय इतरत्र हलविण्यात आले आहे. तातडीने मंत्रालयाने त्यासाठी निधी देण्याची मागणी शिंदे यांनी केली.

टॅग्स :Sanjay Dhotreसंजय धोत्रे