शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल कंपनीने ११०० रुपये बोनस दिला; टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांनी असा बदला घेतला, १० हजार गाड्या फ्रीमध्ये सोडल्या...
2
नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील आगीत ६ वर्षांच्या मुलीसह ४ जणांचा मृत्यू, १० जण जखमी
3
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
4
नवी मुंबईत भीषण आगीत होरपळून माय-लेकीचा मृत्यू; सिलिंडर स्फोटानंतर इतर बाहेर पडले पण दोघी अडकल्या
5
आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
6
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
7
रात्री पार्टी, बहिणीला व्हिडीओ कॉल अन् पहाटे पत्नीचा मृत्यू; मृतदेह सोडून विधानसभा अध्यक्षांचा पुतण्या फरार
8
भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
9
आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
10
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
11
महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
12
महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली
13
बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...
15
मुंबईमध्ये दिवाळीच्या धामधुमीत ३ दिवसांत आगीच्या २५ घटना; वाहन बॅटरीचा स्फोट, एकाचा मृत्यू
16
ऐन दिवाळीत थंडी गायब; अजून काही दिवस उष्म्याचे, इतक्यात तरी पारा घसरायची चिन्हे नाहीत! 
17
लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला चांदी एक हजाराने स्वस्त; सोनेही घटले 
18
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
19
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
20
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."

काश्मीरमधील काही भागांत संचारबंदी; परिस्थिती सुरळीत नाही, सर्वसामान्यांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 03:32 IST

श्रीनगरसह काश्मीर खोऱ्यात जिथे हिंसाचार होण्याची शक्यता आहे तिथे संचारबंदी लागू केली आहे.

श्रीनगर : नमाज पठणानंतर हिंसक घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन काश्मीरमधील काही भागांमध्ये शुक्रवारी संचारबंदी लागू करण्यात आली. ३७० कलम रद्द केल्यानंतरच्या ८९ व्या दिवशी, शुक्रवारीही काश्मीरमधील परिस्थिती सुरळीत नसल्याने त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला.

श्रीनगरसह काश्मीर खोऱ्यात जिथे हिंसाचार होण्याची शक्यता आहे तिथे संचारबंदी लागू केली आहे. जम्मू-काश्मीरचे विभाजन करून जम्मू-काश्मीर व लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला असून, तो निर्णय गुरुवारपासून लागू झाला. त्याविरोधात हिंसक निदर्शने होण्याची शक्यता लक्षात घेऊन ही दक्षता घेण्यात आली. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांची दोन वाहने काही जणांनी जाळली. काश्मीर खोºयातील सर्व बाजारपेठा, तसेच सार्वजनिक वाहतूक सेवा अद्यापही बंदच आहे. मात्र, १० वी व १२ वीच्या परीक्षा वेळापत्रकाप्रमाणे पार पडल्या.मोदींवर मेहबुबा मुफ्तींच्या कन्येची टीका : मोदी, तुम्ही तीन महिन्यांपासून माझी आई मेहबुबा मुफ्ती यांना बेकायदेशीररीत्या डांबून ठेवले आहे अशी तक्रार मेहबुबा यांची कन्या इल्तिजा मुफ्ती यांनी शुक्रवारी टिष्ट्वटरवर केली आहे. काश्मीरमध्ये राजकीय नेते, कार्यकर्ते, नागरिक, अल्पवयीन मुले अशा हजारो जणांना सरकारने डांबून ठेवले आहे. या लोकांना त्यांच्या मातांपासून अजून किती काळ लांब ठेवणार आहात असा सवालही इल्तिजा यांनी मोदी यांना विचारला आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर