शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसामान्यांना हवी आहे 1,000 रुपयांची नोट, 69 टक्के लोकांनी दिला सकारात्मक कौल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2017 21:39 IST

नोटाबंदीनंतर सरकारने हजार रुपयांची नोट चलनातून कायमची हद्दपार केली असली, तरीही सर्वसामान्यांना ती पुन्हा चलनात यावी, असे वाटते. ‘Way2Online’ या मीडिया कंपनीने केलेल्या सुमारे दोन लाख लोकांच्या ऑनलाइन सर्वेक्षणात हे निष्पन्न झाले आहे.

मुंबई, दि. 18 -  नोटाबंदीनंतर सरकारने हजार रुपयांची नोट चलनातून कायमची हद्दपार केली असली, तरीही सर्वसामान्यांना ती पुन्हा चलनात यावी, असे वाटते. ‘Way2Online’ या मीडिया कंपनीने केलेल्या सुमारे दोन लाख लोकांच्या ऑनलाइन सर्वेक्षणात हे निष्पन्न झाले आहे. सर्वेक्षणात 69 टक्के भारतीयांना याबाबत सकारात्मक मते नोंदविली आहेत.नव्याने चलनात आणलेल्या 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांमध्ये खूपच अंतर असल्यामुळे सुट्ट्या पैशांची चणचण भासत असल्याचे अनेक लोकांनी सांगितले. मोठ्या रकमेच्या नोटांमुळे व्यवहार करताना खूप अडचणींचा सामना करावा लागतो, असे 62 टक्के लोकांनी सांगितले. मात्र 38 टक्के लोकांनी त्यांना सुट्टे पैसे मिळण्यात अडचण आली नाही, असे सांगितले आहे. दरम्यान, नव्याने चलनात आलेल्या 200 रुपयांच्या नोटेमुळे सुट्ट्यांची समस्या सुटण्यास साहाय्य होईल, असेही 67 टक्के लोकांनी म्हटले आहे.दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 200 रुपयांची नोट चलनात आणली आहे.  200 रुपयांची नोट चलनात आल्यामुळे नोटाबंदीनंतर निर्माण झालेला कॅश तुटवडा भरुन काढण्यात मदत मिळणार आहे. त्याचबरोबर, येत्या काही दिवसांत 100 रुपयांचे नाणे सुद्धा चलनात येणार असल्याचे संकेत केंद्र सरकारकडून देण्यात आले आहे.  

 जाणून घ्या 100 रुपयांच्या नाण्याची वैशिष्ट्ये ....-100 रुपयांच्या नाण्याचा आकार 44 मिलीमीटर.  - हे नाणं चांदी, कॉपर, निकल आणि झिंक यांचं मिश्रण असणार आहे. - नाण्याच्या एका बाजूला अशोक स्तंभाचे चित्र दिसेल. - या चित्राच्या खालच्या बाजूला सत्यमेव जयते ही अक्षरे झळकतील. -अशोक स्तंभाच्या एका बाजूला भारत तर, दुसऱ्या बाजूला इंडिया लिहिलेले असेल.- वजन 35 ग्रॅम इतके असणार आहे. - दुसरीकडे 5 रुपयाच्या नाण्याचा आकार 23 मिलीमीटर असेल.