आरक्षित जमीनसंदर्भात आयुक्तांनीच निर्णय घ्यावा
By admin | Updated: February 13, 2015 23:11 IST
स्थायी समितीचा फटकार : टाऊ न हॉल जमिनीची फाईल परत नागपूर : तिजोरीवर क ोणताही आर्थिक भार न पडता महापालिकेला जमीन उपलब्ध होणार होती. परंतु प्रशासनाच्या चुकीमुळे यासाठी ११.२३ कोटींचा खर्च करण्याचा विचार होता. आता याच जमिनीच्या वापरात बदल करून तो टाऊ न हॉल ऐवजी ...
आरक्षित जमीनसंदर्भात आयुक्तांनीच निर्णय घ्यावा
स्थायी समितीचा फटकार : टाऊ न हॉल जमिनीची फाईल परत नागपूर : तिजोरीवर क ोणताही आर्थिक भार न पडता महापालिकेला जमीन उपलब्ध होणार होती. परंतु प्रशासनाच्या चुकीमुळे यासाठी ११.२३ कोटींचा खर्च करण्याचा विचार होता. आता याच जमिनीच्या वापरात बदल करून तो टाऊ न हॉल ऐवजी निवास करावा, अशा आशयाचा प्रस्ताव शुक्र वारी मंजुरीसाठी स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला होता. परंतु सदस्यांनी यावर आक्षेप घेतल्याने निर्णयासाठी हा प्रस्ताव आयुक्तांकडे परत पाठविण्यात आला. जरीपटका येथील ६१४४ चौ.मीटर जमीन टाऊ न हॉलसाठी आरक्षित ठेवण्यात आली होती. परंतु मनपाच्या अधिकाऱ्यांनी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा केला नाही. त्यामुळे या जागेच्या अर्ध्या भागात लोकांनी अतिक्रमण करून घरे उभारली. या संदर्भात कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेण्यात आला. परंतु मार्ग निघाला नाही. आता उर्वरित ३६२०.५० चौ.मी. जमीन मनपाला अधिग्रहित करावयाची असल्यास यासाठी ११.२३ कोटी खर्च करावे लागतील. आर्थिक स्थिती बिकट असल्याने रकमेचा भरणा केला नाही तर मनपाला या जागेवर पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांचा शोध घेऊ न त्यांचेवर कारवाई करण्याचे निर्देश समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी दिले.(प्रतिनिधी)चौकट..२९३ नव्हे १३१ फुटांचा तिरंगा!देशातील सर्वात उंच तिरंगा झेंडा नागपुरात उभारण्याची घोषणा बाल्या बोरकर यांनी अर्थसंकल्पात केली होती. परंतु विमानतळ प्राधिकरणकडून याला मंजुरी न मिळाल्याने झेंड्याची उंची २९३ वरून १३१ फूट करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी ४ हजार चौ.फूट जागेची गरज आहे. बॉटनिकल गार्डन वा अंबाझरी तलाव यापैकी एका जागेची निवड केली जाणार आहे. या प्रकल्पावर १.३० कोटीचा खर्च अपेक्षित असून यासाठी जगताप ॲन्ड असोसिएट कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. चौकट...घाटांवर शवदाहिनी लागणारसहकारनगर व मानेवाडा घाटावर गॅसवर चालणारी शवदाहिनी लावण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. यासाठी लवकरच निविदा काढल्या जाणार आहेत. सोबतच घाटावरील हॉल व विविध विकास कामे केली जातील. तसेच मोक्षधाम घाटावर ३० मीटर उंचीची चिमणी लावण्यात येणार आहे. यावर २७ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. घाटावरील सुविधाकडे विशेष लक्ष देत असल्याची माहिती बोरकर यांनी दिली.