शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला इकडे येण्याची संधी, विचार करता येईल, विधिमंडळातच फडणवीसांकडून ऑफर
2
मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; 'पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने'साठी २४ हजार कोटींची तरतूद
3
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
4
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
5
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
6
"माझ्याकडून ज्यांना घेतलं त्यांच्यासाठी मुख्यमंत्री..."; दानवेंच्या निरोपसमारंभात उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला
7
आधी प्रायव्हेट जेटवरून चर्चेत, आता आलिशान जीवनशैली समोर! झोमॅटोच्या मालकाची नेटवर्थ किती?
8
MTNL Loan Defaults: कर्जात बुडालीये 'ही' सरकारी कंपनी; बँकांना परत करू शकत नाहीये ८५८५ कोटींचं लोन, जाणून घ्या
9
भारतातून येमेनच्या मौलवींना गेला एक फोन, 'या' व्यक्तीच्या कॉलने वाचला निमिषा प्रियाचा जीव
10
Festive Hiring 2025: सणासुदीच्या काळात २.१६ लाख नोकऱ्या निर्माण होणार; पाहा कोणत्या क्षेत्रात आहेत संधी?
11
मांजर समजून बिबट्याच्या मागे लागली डॉगेश गँग; सत्य समजताच झाली पळताभुई, पाहा मजेशीर video
12
सुप्रीम कोर्टात बांधलेली काचेची भिंत वर्षभरातच पाडली, करदात्यांचे २.६८ कोटी रुपये वाया
13
Stock Market : सेन्सेक्स-निफ्टी सपाट, पण SBI-पतंजलीसह 'या' शेअर्सनी मारली बाजी, तुमचा स्टॉक यात आहे का?
14
पुण्यात चाललंय काय? सहा महिन्यांत 47 जणांची हत्या, महिन्याला 7 ते 8 हत्या
15
नाशिकमध्ये सहा महिन्यांमध्ये १७ बलात्कार, अत्याचार होतात, गुन्हेही दाखल; पण...
16
Salman Khan: सलमान खानने विकला आलिशान फ्लॅट, किती कोटींना झाली डील? वाचा सविस्तर
17
चिंताजनक! प्रसिद्ध अभिनेत्रीची भयानक अवस्था, रस्त्यावर सापडली, नसीरुद्दीन शाहांसोबत केलंय काम
18
१६०० कोटी पगार! मेटा 'या' व्यक्तींसाठी उधळतोय पाण्यासारखा पैसा, कारण ऐकून धक्का बसेल!
19
दुर्मिळ आजारामुळे १२ किलोंनी वाढला तरुणीच्या स्तनांचा आकार, असह्य वेदना होणारा भयंकर आजार
20
बाबर क्रूर, अकबर सहिष्णू तर औरंगजेब मंदिर पाडणारा', NCERT ने पुस्तकात केले मोठे बदल

भक्तिगीतामुळे मुस्लीम गायिकेवर टीका

By admin | Updated: March 10, 2017 00:25 IST

नही टीव्हीवरील गायन स्पर्धेच्या एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये हिंदू भक्तिगीत म्हटल्याबद्दल सुहाना सईद या कर्नाटकमधील एका तरुण गायिकेला समाजमाध्यमांत

नवी दिल्ली : मुस्लीम असूनही टीव्हीवरील गायन स्पर्धेच्या एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये हिंदू भक्तिगीत म्हटल्याबद्दल सुहाना सईद या कर्नाटकमधील एका तरुण गायिकेला समाजमाध्यमांत कडवट टीकेला सामोरे जावे लागले.एका लोकप्रिय टीव्ही रिअ‍ॅलिटी शोच्या कन्नड आवृत्तीच्या ४ मार्च रोजी झालेल्या पात्रता फेरीत शिवमोगा जिल्ह्यातील २२ वर्षांच्या सुहाना हिने ‘गज’ या चित्रपटातील ‘श्रीकरणे’ हे बालाजी स्तुतीगीत म्हटले. स्पर्धेच्या परीक्षकांनी केवळ तिच्या गानकौशल्याचे कौतुक न करता तिने हे गाणे निवडून सामाजिक ऐक्याचा जो संदेश दिला, त्याबद्दलही तिचे अभिनंदन केले. सुहानाची पुढील फेरीसाठी निवडही झाली.परंतु तिचे हे गाणे कर्नाटकमधील मुस्लीम समाजातील एका वर्गास अजिबात पसंत पडले नाही. ‘मंगलोर मुस्लीम’ या गटाने फेसबूकवर कन्नडमध्ये टाकलेल्या पोस्टमध्ये लिहिले, ‘सुहाना तू पुरुषांच्या समोर गाऊन मुस्लीम समाजास बट्टा लावला आहेस. असे करून फार मोठी बहादुरी गाजविलीस असे समजू नकोस; सहा महिन्यांत संपूर्ण कुरआन मुखोद््गत करणाऱ्यांची कामगिरी याहून मोठी असते. आपल्या सौंदर्याचे प्रदर्शन परपुरुषांसमोर करण्याचे संस्कार तुझ्या आई-वडिलांनी तुझ्यावर केले. तुझ्या या वागण्याने त्यांना स्वर्गात जागा मिळणार नाही. तुला लाज नाही तर ‘पर्दा’ (बुरखा) तरी कशाला घेतेस? तो काढून टाक’.काही वेळाने याच गटाने फेसबूकवर दुसरे पोस्ट टाकले व सुहानावर व्यक्तिगत टीका करण्याचा आपला हेतू नाही. पण तिचे हे वर्तन एका मोठ्या कुटिल कारस्थानाचा भाग असल्याचा त्यांनी आरोप केला. या गटाने नंतर ही दोन्ही पोस्ट फेसबूकवरून काढून टाकली. महिला हक्क कार्यकर्त्या वृंदा अडिगे या मात्र सुहानाच्या पाठीशी उभ्या राहिल्या. सुहानाला आपल्या मनाप्रमाणे मागण्याचा पूर्ण हक्क आहे व तिने अशा टीकेकडे लक्ष देऊ नये, असे त्या म्हणाल्या. (लोकमत न्यूज नेटवर्क)माझ्याकडे पाहून त्यांची भीड चेपेलया टीकेनंतर स्वत: सुहाना हिने कोणतेही भाष्य केलेले नाही. मात्र टीव्ही शोमध्ये परीक्षकांनी कौतुक करून तिला मनोगत व्यक्त करण्यास सांगितले तेव्हा ती म्हणाली होती की, अनेकांकडे प्रतिभा असूनही बहुधा सामाजिक दबावांमुळे ते पुढे येऊ शकत नाहीत. पण माझ्याकडे पाहून त्यांची भीड चेपेल व ते पुढे येऊ शकतील, असे वाटते.