शहरं
Join us  
Trending Stories
1
27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार
2
सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...
3
Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर
4
९३० लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांचे अतोनात हाल होणार; ३ दिवस जम्बो ब्लॉक
5
"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...
6
सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या...
7
"तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर
8
आला रे आला! पुढील २४ तासात मान्सूनची एन्ट्री; कोणत्या राज्यात कधी पाऊस कोसळणार?
9
मनातून मनुस्मृती जाळणं गरजेचं; 'ती' चूक होताच प्रकाश आंबेडकर आव्हाडांवर संतापले!
10
T20 World Cup च्या तोंडावर ICC कडून पाकिस्तानी खेळाडूंना खुशखबर; 'सूर्या'चा दबदबा कायम
11
"मला तुरुंगात ठेवलं तर आप प्रचार न करता ७० पैकी ७० जागा जिंकेल’’, अरविंद केजरीवाल यांचा भाजपाला टोला 
12
रतन टाटांचा एक आदेश अन् 'ताज हॉटेल'मध्ये भटका कुत्रा निवांत झोप घेतो तेव्हा...
13
तिसऱ्यांदा सरकार आलं तर सर्वात पहिले कोणत्या देशात जाणार PM मोदी? परराष्ट्र मंत्रालय सेट करतंय कार्यक्रम
14
Fact Check: पाकिस्तानला ५ हजार कोटींचे कर्ज देण्याची घोषणा राहुल गांधींनी केलेलीच नाही; 'तो' मेसेज खोटा
15
"तीन दिवसांत माफी मागा नाहीतर..."; मुख्यमंत्री शिंदेंनी थेट संजय राऊतांना धाडली नोटीस
16
₹3 चा स्टॉक असलेली कंपनी 20 फ्री शेअर वाटणार, गुंतवणूकदारांना मालामाल करणार! LIC कडे 97 लाख शेअर
17
आतापर्यंतचे सर्व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणारे २ शिलेदार; रोहितचा 'नाना' विक्रमांवर डोळा!
18
‘’एका वर्षात नवीन पटनाईक यांची तब्येत एवढी कशी बिघडली, काही कट आहे का?’’, मोदींनी व्यक्त केली शंका
19
IndiGo कडून आता महिला प्रवाशांना फ्लाइट बुकिंगदरम्यान मिळणार खास सुविधा
20
दिल्लीत उष्णतेने मोडले सर्व रेकॉर्ड! राजधानीत तापमान ५२ अंशांच्या पुढे

दिलासा! फेब्रुवारीत चौथ्यांदा नवे रुग्ण 10 हजारांखाली, देशात बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्क्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 7:33 AM

coronavirus News : देशात १,०६,३३,०२५ लोक रोगमुक्त झाल्याने बरे होण्याचे प्रमाण ९७.३२ टक्के झाले आहे तर मृत्यूदर १.४३ आहे.

नवी दिल्ली : देशात फेब्रुवारीत चौथ्यांदा नवे रुग्ण १० हजारांपेक्षा कमी आले आहेत. गत २४ तासातील कोरोना रुग्णांची संख्या ९,१२१ आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या आता १,०९,२५,७१० झाली आहे. या महिन्यात दहाव्यांदा एका दिवसात १००पेक्षा कमी लोकांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, देशात आणखी ८१ लोकांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या आता १,५५,८१३ झाली आहे. देशात १,०६,३३,०२५ लोक रोगमुक्त झाल्याने बरे होण्याचे प्रमाण ९७.३२ टक्के झाले आहे तर मृत्यूदर १.४३ आहे. देशात उपचाराधिन रुग्णांची संख्या १,३६,८७२ आहे. हे प्रमाण एकूण रुग्णांच्या १.२५ टक्के आहे. देशात आतापर्यंत २० कोटींहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. यातील ६,१५,६६४ चाचण्या सोमवारी करण्यात आल्या. 

१७ राज्यांत एका दिवसात एकही मृत्यू नाही२४ तासांत १७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाही. तसेच, सहा प्रदेशात कोरोनाचा नवा रुग्ण आढळून आलेला नाही. दमन आणि दीव व दादरा व नगर हवेलीत बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९९.८८ टक्के आहे.१७ राज्यात व केंद्रशासित प्रदेशात गत २४ तासात कोरोनाने मृत्यू झाला नाही त्यात लक्षव्दीप, सिक्किम, हिमाचल, उत्तराखंड, गुजरात, चंदीगड, जम्मू काश्मीर, मेघालय, लडाख, मणीपूर, हरयाणा, अंदमान निकोबार, राजस्थान, नागालँड, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, दमन आणि दीव व दादरा व नगर हवेली यांचा समावेश आहे. 

ॲस्ट्राजेनेकाला हूची आपत्कालीन मंजुरी टोरंटो -  जागतिक आरोग्य संघटनेने ॲस्ट्राजेनेका लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि दक्षिण कोरियाच्या ॲस्ट्राजेनेका - एसके बायो यांनी ही लस तयार केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे सहायक संचालक डॉ. मारियांगेला सिमाओ यांनी सांगितले की, ज्या देशांमध्ये अद्याप लस उपलब्ध होऊ शकली नाही, ते आता लसीकरण सुरु करु शकतील. लसीअभावी अनेक देशात अद्याप लसीकरण सुरु झालेले नाही. ॲस्ट्राजेनेका ही लस ब्रिटन, भारत, अर्जेंटिना आणि मेक्सिको यांच्यासह ५० देशात आधीपासूनच अधिकृत आहे. 

व्हिटामिन सी परिणामकारक नाही झिंक आणि व्हिटामिन सी घेतल्याने कोरोना रुग्णांची लक्षणे कमी होत नाहीत, असे एका अध्ययनातून समोर आले आहे. अमेरिकेतील क्लिवलँड क्लिनिकच्या संशोधकांनी म्हटले आहे की, झिंक हे रोगप्रतिकारक कार्यासाठी महत्वपूर्ण मानले जाते. व्हिटामिन सी हे एंटीऑक्सिडेंट आणि पेंशीचे नुकसान रोखण्यासाठी महत्वपूर्ण ठरते. चार समूहांवर केलेल्या प्रयोगातून विशेष फरक आढळून आला नाही.

न्यायालयीन कर्मचाऱ्यांना लसीसाठी प्राथमिकता?लसीकरण अभियानात न्यायाधीश, न्यायालयाचे कर्मचारी यांना प्राथमिकता देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली असून यावर सुनावणी करण्यास न्यायालयाने सहमती दर्शविली आहे. वकील अरविंद सिंह यांनी ही याचिका दाखल केली असून यावर दोन आठवड्यानंतर सुनावणी होईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या