शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

चार राज्यांत लसीकरणाची रंगीत तालीम, केंद्र सरकारची जय्यत पूर्वतयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2020 06:50 IST

corona vaccination update : लस टोचल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या प्रकृतीवर काही विपरीत परिणाम होत नाही ना, याकडे डॉक्टर लक्ष देतील.

नवी दिल्ली : देशात एखाद्या कोरोना लसीस आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळाल्यास जानेवारीमध्ये लसीकरण मोहिमेला सुरुवात होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन येत्या २८ व २९ डिसेंबरला पंजाब, आसाम, आंध्र प्रदेश, गुजरात या चार राज्यांमध्ये केंद्र सरकारकडून लसीकरणाची रंगीत तालीम केली जाणार आहे.हा सराव करताना को-विन अ‍ॅपमध्ये लस घेणाऱ्याचे नाव नोंदवले जाईल. त्या संबंधित व्यक्तीला या अ‍ॅपच्या माध्यमातून लस टोचून घेण्याची वेळ, ठिकाण, दिवस कळविला जाईल. लस टोचण्यासाठी प्रत्येक केंद्रामध्ये विशिष्ट संख्येने कर्मचारी या रंगीत तालमीत उपस्थित राहतील. ज्याला लस टोचली आहे, त्याला नंतर अर्धा तास एका खोलीत निरीक्षणाखाली ठेवले जाईल. लस टोचल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या प्रकृतीवर काही विपरीत परिणाम होत नाही ना, याकडे डॉक्टर लक्ष देतील. दिवसभरात किती लोकांना एका केंद्रामध्ये लस टोचण्यात आली, याची नोंदही को-विन अ‍ॅपच्या माध्यमातून ठेवली जाईल. लसीकरणाची रंगीत तालीम प्रत्येक राज्याच्या दोन जिल्ह्यांत पार पडेल. प्रत्येक जिल्ह्यात पाच ठिकाणी हा सराव केला जाईल.

येथे होणार सराव- पंजाब - आसाम- आंध्र प्रदेश- गुजरात

लसीची साठवणूक, वाहतुकीवरही लक्षकेंद्रीय आरोग्य खात्याने सांगितले की, केवळ लोकांना लस टोचणे हीच गोष्ट नव्हेतर, लसीची शीतगृहांमध्ये साठवणूक करणे, त्या लसीची व्यवस्थित ने-आण करणे, या गोष्टीही नीट पार पडणे आवश्यक आहे. त्याकडेही रंगीत तालमीत विशेष लक्ष दिले जाणार आहे.

देशात केवळ २.८१ लाख सक्रिय रुग्ण देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या आता अवघी २ लाख ८१ हजार इतकी उरली आहे. ९७ लाख १७ हजारांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या