शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

चेन्नईत विद्यार्थ्यांच्या हातावर जातीचा रंग

By admin | Updated: November 4, 2015 15:43 IST

जातीय भेदभाव संपवण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच चेन्नईजवळील तिरुनलवेली येथील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या हातावरच जातीय रंग दिसून येतो.

ऑनलाइन लोकमत 

चेन्नई, दि. ४ -  जातीय भेदभाव संपवण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच चेन्नईजवळील तिरुनलवेली येथील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या हातावरच जातीय रंग दिसून येतो. विद्यार्थ्यांसाठी जातनिहाय रिस्ट बँड तयार करण्यात आले असून टिकली, रिबीन्सचा रंगही जातीनुसारच ठरवला जातो. 
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार तिरुनवेली येथील सरकारी शाळेतील विद्यार्थी हातात रिस्ट  बँड घालून येतात. प्रत्येक जातीसाठी एका विशिष्ट रंगाचा बँड दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हातावरील बँडवरुन त्यांची जात ओळखता येते व मुलांना त्यांचा मित्र कोण व शत्रू कोण हे ओळखता येते. थेवर समाजासाठी लाल व पिवळा, नाडर समाजासाठी निळा आणि पिवळा, यादव समाजातील मुलांसाठी भगवा रंग असतो. तर दलित वर्गात येणा-या पल्लर समाजातील मुलांसाठी हिरवा व लाल, अरुधंतीयार समाजातील मुलांसाठी हिरवा, काळा व पांढ-या रंगाचा व्रिस्ट बँड घालून येतात. 
ऑगस्टमध्ये तिरुनवेली येथे विद्यार्थ्यांमधील वाढत्या जातीय संघर्षावर अभ्यास करण्यात आला. यात रिस्ट बँडच्या आधारे विद्यार्थी एकमेकांवर हल्ले करत असल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर जिल्हाधिका-यांनी शाळेत रिस्ट बँड घालण्यावरच बंदी घालण्याचे तोंडी आदेश दिले. पण यानंतर अद्याप लेखी आदेश काढण्यात आलेले नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.  रिस्ट बँडसोबतच टिकली किंवा रिबीन्सचा वापरही सुरु झाला आहे असे एका विद्यार्थिनीने सांगितले. 
तिरुनवेलीतील विद्यार्थ्यांमध्ये जातीय विष किती पसरले आहे याचे उदाहरणही एका मुख्याध्यापकाने दिले. काही दिवसांपूर्वी शाळेतील कनिष्ठ जातीच्या विद्यार्थ्यांने मोबाईलवर त्याच्या जातीतील गाणे लावले. यावर उच्च जातीच्या मुलांनी आक्षेप घेतला. या वादाला काही वेळाने हिंसक वळण लागले अशी आठवण मुख्याध्यापकांनी सांगितली. जातीय भेदाभेद संपुष्टात आणण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते लढा देत असताना दुसरीकडे शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये आत्तापासून जातीयवाद बिंबवणा-या या प्रकारावर नाराजी व्यक्त होत आहे.