शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्याच्या पत्नीसोबत कर्नलचे अफेअर, दोनदा हॉटेलला घेऊन गेला; सैन्यानं केली कारवाई, मात्र...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 12:24 IST

आता या शिक्षेला संयोजकांकडून मंजुरी मिळणे बाकी आहे. दोषी कर्नलवर विविध कलमातंर्गत २ आरोप लागले आहेत.

नवी दिल्ली - एका कर्नलला लष्कर अधिकाऱ्याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध बनवणं महागात पडलं आहे. कर्नलचा प्रताप लष्कर अधिकाऱ्याला कळताच त्याने याबाबत वरिष्ठांना तक्रार केली. या तक्रारीत जेव्हा आरोपी कर्नल दोषी आढळला तेव्हा त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. परंतु या संपूर्ण प्रकारात लष्कर अधिकाऱ्याच्या पत्नीने वेगळीच कहाणी सांगितली आहे. नेमकं हा काय प्रकार आहे जाणून घेऊया.

ज्या प्रकरणात कर्नलला बरखास्त करण्यात आले, हे प्रकरण मे २०२५ पासून सुरू होते. कर्नलच्या सहकारी लष्करी अधिकाऱ्याने त्यांच्यावर पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला. तक्रारदार पतीने म्हटलं की, एका निनावी माणसाने पाठवलेल्या पॅकेजमध्ये मला पत्नीचे कॉल डिटेल्स सापडले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याचा तपास केला असता कर्नल दोषी आढळले, तेव्हा सैन्याच्या कोर्ट मार्शलने कर्नलवर बरखास्तीची कारवाई केली. 

किती आरोप लागले?

अवैध संबंध प्रकरणाची सुनावणी मुख्यालय युनिफॉर्म्ड फोर्सेसचे ब्रिगेडियर जगमिंदर सिंग गिल आणि सहा कर्नल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. ती ८ व्या माउंटन डिव्हिजनचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल के. महेश यांनी आयोजित केली. आता या शिक्षेला संयोजकांकडून मंजुरी मिळणे बाकी आहे. दोषी कर्नलवर विविध कलमातंर्गत २ आरोप लागले. पहिला आरोप सप्टेंबर २०२१ आणि ऑगस्ट २०२२ मध्ये टेलिफोनच्या माध्यमातून सहकारी अधिकाऱ्याशी पत्नीशी संवाद साधला. परंतु या आरोपात ते दोषी आढळले नाहीत. दुसरा आणि तिसरा आरोप कर्नलवर सप्टेंबर २०२१ आणि एप्रिल २०२२ मध्ये लष्करी अधिकाऱ्याच्या पत्नीसोबत हरिद्वार आणि देहारादून येथे हॉटेलवर थांबल्याचा लागला. या आरोपात कर्नल दोषी आढळले. 

पत्नीने केला वेगळाच दावा

या प्रकरणात लष्कर अधिकाऱ्याच्या पत्नीने वेगळाच दावा केला. तिच्या साक्षीनुसार ती प्राथमिक विद्यालयापासून दोषी कर्नलसोबत एकत्रित शिकायला होती. बालपणापासून हे मित्र होते. माझे वय ४२ असून वयस्क होण्याच्या नाते मला कुणाशी बोलायचे याचा अधिकार आहे. आम्ही कुठल्याही हॉटेलला एकत्र राहिलो नाही असा दावा तिने केला. सोबतच पतीसोबत घरगुती हिंसाचार, हुंड्यासाठी छळ आणि लैंगिक शोषणाचा आरोप पत्नीने केला. पतीसोबत राहणे मला अशक्य आहे असं पत्नीने म्हटलं. 

English
हिंदी सारांश
Web Title : Colonel's affair with officer's wife leads to dismissal, twist revealed.

Web Summary : A colonel was dismissed for an affair with an officer's wife after the husband complained. The wife claimed they were childhood friends and denied any wrongdoing. She accused her husband of domestic violence and harassment.
टॅग्स :Indian Armyभारतीय जवान