शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
2
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
3
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...
4
ग्रीन झोनमध्ये शेअर बाजाराची कामकाजास सुरुवात; मोठ्या चढ-उतारासह 'हे' शेअर्स उघडले
5
'निमिषा प्रियाला अजिबात माफ केले जाणार नाही, तिला ताबडतोब फाशी द्या', तलालच्या भावाने तिसऱ्यांदा दाखल केली याचिका
6
Tarot Card: ध्येयपूर्तीकडे वाटचाल करायला लावणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
7
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
8
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
9
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
10
Viral Video : भर रस्त्यात हाय वोल्टेज ड्रामा! पत्नीने पतीच्या कानशिलात लगावल्या, कशावरून सुरू झालेला वाद?
11
आमिर खानच्या कुटुंबियांनी जारी केलं स्टेटमेंट, भाऊ फैजल खानचे सर्व आरोप फेटाळले
12
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
13
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
14
Video: अल्लू अर्जुनने विमानतळावर अधिकाऱ्यासमोर दाखवला माज; अखेर काढावाच लागला मास्क
15
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
16
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
17
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
18
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
19
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
20
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस

‘कॉलेजियम’ वर्षभरानंतर पुन्हा लागले कामाला

By admin | Updated: February 15, 2016 03:49 IST

न्यायाधीशांनीच न्यायाधीशांची निवड करण्याची ‘कॉलेजियम’ पद्धत मोडीत काढून त्याऐवजी राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या घटनादुरुस्ती आणि कायद्याची वैधता तपासू

नवी दिल्ली : न्यायाधीशांनीच न्यायाधीशांची निवड करण्याची ‘कॉलेजियम’ पद्धत मोडीत काढून त्याऐवजी राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या घटनादुरुस्ती आणि कायद्याची वैधता तपासून अखेरीस ही नवी व्यवस्था घटनाबाह्य ठरवून रद्दबातल केली जाईपर्यंतच्या गेल्या सुमारे वर्षभराच्या काळात पूर्णपणे ठप्प राहिलेले सर्वोच्च न्यायालयाचे ‘कॉलेजियम’ आता पुन्हा कामाला लागले आहे.माहीतगार सूत्रांनुसार सरन्यायाधीश न्या. तीर्थ सिंग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली ११ फेब्रुवारी रोजी ‘कॉलेजियम’ची बैठक झाली व त्यात मद्रास, कर्नाटक, अलाहाबाद आणि दिल्ली उच्च न्यायालयातील काही न्यायाधीशांच्या इतरत्र बदल्या करण्याची शिफारस करण्यात आली. या शिफारशींवर केंद्रीय विधि आणि न्याय मंत्रालय आता पुढील कारवाई करेल.या शिफारशींमध्ये मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. सी.एस. कन्नन यांच्या बदलीची शिफारस विशेष लक्षणीय म्हणावी लागेल. त्या न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संजय कृष्ण कौल जातीयवादी वृत्तीने वागत असल्याचा आरोप करणारे पत्र न्या. कन्न यांनी अलीकडेच सरन्यायाधीशांना पाठविले होते. यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात याचिकाही केली आहे. त्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी सरन्यायाधीश न्या. ठाकूर यांनी न्या. कन्नन यांच्या बदलीचा निर्णय होऊ घातला आहे, असे संकेत दिले होते.विविध उच्च न्यायालयांमध्ये रिक्त असलेल्या न्यायाधीशांच्या ४०० हून अधिक जागा भरणे हे वर्ष २०१६ मधील आपल्यापुढील सर्वात मोठे आव्हानात्मक काम असेल, असे सरन्यायाधीशांनी पदावर रुजू झाल्यानंतर म्हटले होते. ‘कॉलेजियम’च्या वैधतेचा तिढा सुटल्यानंतर आता त्यांनी उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहून रिक्त पदांवरील नियुक्त्यांसाठी पात्र उमेदवारांची नावे सुचविण्यास कळविले आहे, असेही सूत्रांकडून समजते. मात्र, ‘कॉलेजियम’ पुन्हा कामाला लागले असले तरी न्यायाधीशांच्या नव्या नेमणुकांची प्रक्रिया लगेच सुरू होईल, असे दिसत नाही. सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग रद्द केल्यानंतर पूर्वीचीच ‘कॉलेजियम’ पद्धत अधिक पारदर्शी कशी करता येईल याविषयी निर्देश दिले होते. त्यानुसार न्यायाधीशांच्या नियुक्त्या व बदल्यांसंदर्भात नवे ‘मेमोरँडम आॅफ प्रोसिजर’ तयार करावे लागणार आहे. केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांची मते घेऊन ते तयार करावे, असे न्यायालयानेच सांगितले आहे. केंद्राने यासाठी राज्यांकडे मते मागितली आहेत; पण सर्व राज्यांकडून ती अद्याप आलेली नाहीत. ती येतील त्यानंतर नव्या ‘मेमोरँडम’चा मसुदा तयार होईल व त्यानंतर ‘कॉलेजियम’ त्यानुसार नव्या न्यायाधीशांच्या निवडीचे काम सुरू करू शकेल. यासाठी आणखी काही महिने जातील, असे दिसते.(लोकमत न्यूज नेटवर्क)