शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कॉलेजियम सक्रिय, लवकरच बैठक

By admin | Updated: November 1, 2015 23:57 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमची लवकरच बैठक होणार असून, आठ उच्च न्यायालयांमधील मुख्य न्यायाधीशांच्या नियुक्तीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमची लवकरच बैठक होणार असून, आठ उच्च न्यायालयांमधील मुख्य न्यायाधीशांच्या नियुक्तीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. २१ अतिरिक्त न्यायाधीशांचा कार्यकाळ वाढविण्याची शिफारस कॉलेजियमने यापूर्वीच केली आहे.आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, गुवाहाटी, गुजरात, पाटणा, पंजाब- हरियाणा तसेच राजस्थान उच्च न्यायालयांमधील नियमित न्यायाधीशांच्या नियुक्तीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या न्यायालयांचे कामकाज सध्या हंगामी मुख्य न्यायाधीशांमार्फत चालविले जात आहे. उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांचे पद रिक्त असल्यास किंवा ते कर्तव्य बजावू शकत नसल्यास राष्ट्रपतींच्या आदेशानुसार अन्य न्यायाधीशाकडे ती जबाबदारी सोपविली जाते. सरकारने अलीकडेच काही उच्च न्यायालयांमध्ये हंगामी मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती करीत या तरतुदीचा वापर केला होता.सहा महिने प्रक्रिया ठप्पसर्वोच्च न्यायालय आणि २४ उच्च न्यायालयांतील न्यायाधीशांच्या नियुक्तीबाबत १३ एप्रिल ते १६ आॅक्टोबर या सहा महिन्यांच्या काळात कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नव्हती. सुधारित कायद्यानुसार राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग (एनजेएसी) लागू करण्यासंबंधी अधिसूचना १३ एप्रिल रोजी जारी करण्यात आली होती. गेल्याच महिन्यात १६ आॅक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने हा आयोग रद्दबातल ठरवत न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी जुनीच कॉलेजियम पद्धत योग्य ठरविली. एनजेएसी कायदा लागू झाल्यानंतरही प्रस्तावित पॅनलला काम करता येऊ शकले नाही. सरन्यायाधीश एच.एल. दत्तू यांनी त्याचा भाग बनण्यास नकार दिला होता.