शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

CAA: तिरंगा यात्रेदरम्यान वाद; महिला जिल्हाधिकाऱ्यानं भाजपा नेत्याच्या श्रीमुखात भडकावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 19:47 IST

परवानगी नसताना यात्रा काढण्याचा प्रयत्न; पोलिसांचा लाठीमार

भोपाळ: सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ तिरंगा यात्रा काढणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांच्या यात्रेदरम्यान मोठा गोंधळ झाला. राजगढ परिसरात कलम १४४ लागू असतानाही भाजपा कार्यकर्त्यांनी तिरंगा यात्रा काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपा कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. यावेळी जिल्हाधिकारी निधी निवेदिता यांच्यासोबत कार्यकर्त्यांचा वाद झाला. या दरम्यान निधी यांनी भाजपा नेत्याच्या कानशिलात लगावली. निधी निवेदिता यांनी भाजपा नेत्याच्या श्रीमुखात भडकावल्यानं मोठा वाद निर्माण झाला. यानंतर भाजपा कार्यकर्त्यांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना बराच संघर्ष करावा लागला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना काही वेळ लाठीमारदेखील केला. यामध्ये दोन कार्यकर्ते जखमी झाले. राजगढमध्ये संचारबंदी लागू असल्यानं पोलिसांनी भाजपाच्या यात्रेला परवानगी दिली नव्हती. मात्र तरीही भाजपा कार्यकर्त्यांनी तिरंगा यात्रा काढली. राजगढच्या जिल्हाधिकारी निधी निवेदिता आणि पोलीस अधीक्षकांनी भाजपा कार्यकर्त्यांना रोखण्याचे प्रयत्न केले. मात्र कार्यकर्ते कोणाचंही ऐकत नव्हते. त्यांनी परवानगी नसतानाही तिरंगा यात्रा काढण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान दोनदा प्रशासकीय अधिकारी आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. निधी निवेदिता यांनी कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यकर्ते त्यांचं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. भाजपा कार्यकर्त्यांनी निधी यांच्याशी वाद घातला. यावेळी निधी यांनी भाजपा नेत्याच्या कानशिलात लगावली.  

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकBJPभाजपा