नवी दिल्ली, ५ मे: ईवाय-पार्थेनॉन (ईवाय-पी)–भारतातील आघाडीची धोरणात्मक सल्लागार संस्था आणि बुकमायशो लाईव्ह – बुकमायशो या भारतातील आघाडीच्या मनोरंजन प्लॅटफॉर्मचा लाईव्ह एंटरटेनमेंट अनुभव विभाग यांनी संयुक्तपणे ‘भारताची वाढती कॉन्सर्ट इकॉनॉमी : कोल्डप्लेच्या अहमदाबाद टूरने भारताच्या पुढील सांस्कृतिक केंद्रांसाठी आराखडा’ या शीर्षकाचा अहवाल सादर केला आहे. या अहवालात बुकमायशो लाईव्ह यांनी निर्मित व प्रमोट केलेल्या भारतातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या लाईव्ह एंटरटेनमेंट शो – कोल्डप्लेच्या दोन रात्रींच्या ‘म्युझिक ऑफ द स्फिअअर्स’ कॉन्सर्ट्सचा एकूण परिणाम विशद करण्यात आला आहे.
या अहवालामध्ये अशा मॉडेलचे उदाहरण दिले आहे, जे इतर भारतीय शहरांसाठी अनुकरणीय ठरू शकते, ज्याच्या आधारे स्थानिक शासन, प्रशासन आणि विविध संस्था पर्यटन वाढवण्यासाठी, पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आणि आर्थिक विकासासाठी एकत्र येऊ शकतात. पुणे जे संगीत संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे, यासाठी हा अहवाल एक दिशा दर्शवतो की, कसे नियोजित गुंतवणूक, पायाभूत सुविधा, पर्यटन आणि सार्वजनिक सेवा यांच्या माध्यमातून ते भारतातील अग्रगण्य लाईव्ह एंटरटेनमेंट केंद्र होऊ शकते. या शहराची वाढती ओळख नुकत्याच झालेल्या जागतिक सुपरस्टार एड शीरनच्या टूरमुळे अधोरेखित झाली. पुणे हे आंतरराष्ट्रीय आणि भारतीय कलाकारांसाठी एक उदयोन्मुख मार्केट म्हणून पुढे येत आहे.
कोल्डप्लेचा ‘म्युझिक ऑफ द स्फिअअर्स वर्ल्ड टूर’ भारतात ५०० हून अधिक शहरांमधून आलेल्या २,२२,००० हून अधिक चाहत्यांनी अनुभवला. त्यामध्ये पुणे हे टॉप ५ शहरांमध्ये होते. २८ राज्यांमधून प्रेक्षक अहमदाबादला आले होते – हे भारतातील लाईव्ह एंटरटेनमेंटच्या जबरदस्त आकर्षणाचे प्रत्यक्ष उदाहरण आहे. संगीत पर्यटनात मोठी वाढ झाली आणि ते वर्षातील महत्त्वपूर्ण ट्रेंडपैकी एक बनले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या कॉन्सर्ट इकॉनॉमीला दिलेला पाठिंबा लक्षवेधी होता. त्यांनी मुंबई आणि अहमदाबाद येथील कोल्डप्ले कॉन्सर्ट्सचा विशेष उल्लेख केला आणि देशातील लाईव्ह इव्हेंट्सच्या वाढत्या संधी आणि मागणीचा तो पुरावा असल्याचे सांगितले.
या अहवालावर प्रतिक्रिया देताना ईवाय-पार्थेनॉनचे भागीदार आणि डिजिटल, मीडिया आणि कन्वर्जन्स विभागाचे प्रमुख राघव आनंद म्हणाले की, भारताचा लाईव्ह एंटरटेनमेंट क्षेत्र अतिशय वेगाने वाढत असून २०२४ मध्ये ₹१२,००० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. पुढील तीन वर्षांत हे क्षेत्र सुमारे १९ टक्के वार्षिक वाढीच्या दराने प्रगती करेल, असा अंदाज आहे. ग्राहकांचा जागतिक दर्जाच्या इव्हेंट्सकडे वाढता ओढा ही केवळ वाढती क्रयशक्ती नव्हे, तर बदलती सांस्कृतिक मानसिकता दर्शवते, जी अधिक सखोल अनुभवांची मागणी करते. या क्षेत्रात असलेली आर्थिक क्षमता अफाट असून, ती संबंधित क्षेत्रांमध्येही विकासाला चालना देते आणि स्थानिक तज्ज्ञ व कलाकारांसाठी संधी निर्माण करते.
बुकमायशो चे मुख्य परिचालन अधिकारी (सीओओ) – लाईव्ह एंटरटेनमेंट आणि स्थळ व्यवस्थापन विभागाचे अनिल माखीजा म्हणाले की, कोल्डप्लेचे म्युझिक ऑफ द स्फिअअर्स कॉन्सर्ट अहमदाबादमध्ये आयोजित करणे हे भारताच्या मनोरंजन इकॉनॉमीसाठी ऐतिहासिक ठरले. जगातील सर्वात मोठ्या बँडपैकी एकाला, जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये, दररोज १,११,००० पेक्षा अधिक प्रेक्षकांसमोर सादर करणे, ही भारतात काय शक्य आहे याची पुनर्कल्पना होती. हा अहवाल इतर राज्यांसाठी प्रेरणादायक ठरू शकतो, ज्यायोगे कॉन्सर्ट इकॉनॉमीमधील अपार संभावनांचा वापर करता येईल आणि देशासाठी संपत्ती निर्माण करणारे माध्यम म्हणून लाईव्ह एंटरटेनमेंट इंडस्ट्रीला प्रोत्साहन मिळेल. ईवाय सोबत काम करताना आम्ही दाखवून दिलं की, एकमेव कॉन्सर्टही भारताच्या पुढील सांस्कृतिक केंद्रांचा आर्थिक व सांस्कृतिक विकास घडवून आणू शकतो. शासन आणि इंडस्ट्री यांच्यातील एकत्रित आणि सुसंगत धोरण राबवणे हे या संभाव्यतेच्या पूर्ण उपयोगासाठी अत्यंत आवश्यक आहे.
हा अहवाल एंटरटेनमेंट क्षेत्राची अर्थव्यवस्थेवर होणारी परिणामकारक क्षमता ठोसपणे दाखवून देतो
- कॉन्सर्टमध्ये एकूण ₹६४१ कोटींची उलाढाल झाली. ज्यामध्ये थेट ₹३९२ कोटींची भर अहमदाबादच्या अर्थव्यवस्थेला मिळाली आणि भारत सरकारला ₹७२ कोटींचा जीएसटी महसूल प्राप्त झाला. देशभरातील ५०० शहरांमधून, २८ राज्ये आणि ५ केंद्रशासित प्रदेशांमधून आलेले २,२२,००० हून अधिक चाहते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, ज्यामुळे पर्यटन, हॉस्पिटॅलिटी, रिटेल आणि ट्रान्सपोर्ट या क्षेत्रांना मोठी चालना मिळाली.
- अहमदाबादच्या वाहतूक व्यवस्थेने आपली सर्वोत्तम कामगिरी केली. विशेष जलदगती गाड्या धावल्या, विमानतळ आणि मेट्रो स्थानकांवर तीन दिवसांत १,३८,००० हून अधिक प्रवाशांची वर्दळ झाली. पहिल्या कॉन्सर्ट दिवशी ४७,००० आगमनांसह विक्रमी आकडा गाठण्यात आला, तर स्थानिक मेट्रो प्रणालीनेही याआधीचे सर्व प्रवासी विक्रम मोडले, ज्यामुळे अहमदाबादची जागतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याची क्षमता अधोरेखित झाली. हॉटेलचे दरही केवळ ४८ तासांत ₹१५,००० वरून थेट ₹९०,००० पर्यंत पोहोचले.
- या आर्थिक परिणामापलीकडे, या कॉन्सर्टमुळे अहमदाबादच्या सांस्कृतिक ओळखीमध्येही बदल झाला. ७८ टक्क्यांपेक्षा अधिक उपस्थितांनी आता अहमदाबादकडे प्रमुख कॉन्सर्ट शहर म्हणून पाहिले, तर ६६ टक्के उपस्थितांनी पुन्हा येथे येण्याची इच्छा दर्शवली. याशिवाय, जवळपास ७९% प्रेक्षक ३५ वर्षांखालील वयोगटातील होते, यामुळे हे स्पष्ट होते की मनोरंजनावरचा खर्च हा तरुण वर्गाच्याच हातात आहे.
- बुकमायशो ने २,८०० पेक्षा अधिक प्रेक्षकांवर केलेल्या सर्व्हेमधून काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. या कॉन्सर्टने अहमदाबादच्या प्रोत्साहनात मोठी भूमिका बजावली. प्रत्येक ₹१०० च्या कॉन्सर्ट तिकिटांवर, स्थानिक सेवांवर ₹५८५ अधिक खर्च झाला. ५० टक्के उपस्थितांनी कॉन्सर्टनंतर एक दिवस अतिरिक्त राहून स्थानिक हॉस्पिटॅलिटी क्षेत्राच्या उत्पन्नात भर घातली. एकूण ५० टक्के प्रेक्षकांनी केवळ कॉन्सर्टसाठीच नव्हे, तर त्यानंतरही एकाहून अधिक रात्र राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे स्थानिक व्यवसायांना अजून चालना मिळाली.
- या कॉन्सर्टमुळे १५,००० हून अधिक नोकऱ्या तयार झाल्या, ज्यामध्ये ९,००० स्थानिक लोकांचा समावेश होता, हे या कार्यक्रमाने स्थानिक रोजगारात दिलेले योगदान स्पष्ट करते.
- या इव्हेंटदरम्यान, ९५% पेक्षा अधिक कचरा लँडफिलमध्ये जाण्यापासून वाचवला गेला आणि १,००,००० हून अधिक बायोडिग्रेडेबल कप्स वितरित करण्यात आले. याशिवाय, सुमारे ७० टक्के एलईडी बँड्स परत मिळाले आणि पुढील कार्यक्रमांसाठी पुन्हा वापरण्यात आले.
नरेंद्र मोदी स्टेडियमला जागतिक दर्जाच्या कॉन्सर्ट व्हेन्यूमध्ये रूपांतरित करणे हे भारताच्या लाईव्ह एंटरटेनमेंटमधील वाढत्या ताकदीचं प्रतीक ठरलं. या कॉन्सर्टने हे सिद्ध केलं की योग्य भागीदारी, व्यवसाय सुलभता, जलद आणि सुरळीत परवानग्या आणि चांगल्या पायाभूत सुविधांमुळे भारत अशा जागतिक कार्यक्रमांसाठी सज्ज होत आहे. भारतातील लाईव्ह एंटरटेनमेंट इंडस्ट्री पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप्स (PPP) च्या माध्यमातून आणखी वेगाने विकसित होऊ शकते, जी इन्फ्रास्ट्रक्चर सुधारते, परवानग्या सुलभ करते, व्यवसायसुलभता वाढवते, सिंगल-विंडो क्लिअरन्स सिस्टम, कर सवलती आणि वेगवान मंजूरी प्रक्रिया उपलब्ध करून देते. भारत एका निर्णायक वळणावर आहे – योग्य पाठबळ मिळाल्यास लाईव्ह एंटरटेनमेंटमुळे देशाची अर्थव्यवस्था बळकट होईल, रोजगार निर्माण होईल आणि भारताची ओळख जागतिक मंचावर ठळकपणे होईल.
“जगातील सर्वात मोठ्या बँड्सपैकी एकाला भारतात आणणे हे अत्यंत काटेकोर नियोजन, सहकार्य आणि सामायिक दृष्टिकोनातून शक्य झाले. कोल्डप्लेच्या ‘म्युझिक ऑफ द स्फीयर्स वर्ल्ड टूर’साठी अहमदाबादची निवड ही दोन मुख्य कारणांमुळे झाली – अभूतपूर्व ग्राहक मागणी आणि शहराची मजबूत इन्फ्रास्ट्रक्चर. मुंबईतील तीन सोल्ड-आउट शो नंतर, नरेंद्र मोदी स्टेडियमने आम्हाला दररोज १ लाखांहून अधिक चाहत्यांचं आयोजन करण्याची संधी दिली. स्थानिक अधिकाऱ्यांचा पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा ठरला आणि आम्ही एकत्र येऊन क्रिकेटची खेळपट्टी वाचवण्यासाठी खास टर्फ प्रोटेक्टर्स वापरले. लाईव्ह एंटरटेनमेंटचे विकेंद्रीकरण हे भविष्यातील दिशा आहे आणि अधिकाधिक जागतिक कलाकार भारतात परफॉर्म करत असताना, आम्ही हे शक्य करण्यासाठी कटिबद्ध आहोत. या कॉन्सर्टचा आर्थिक परिणाम मोठा होता – शहर, राज्य आणि देश पातळीवर महसूल वाढला. उद्योग आणि शासन यांच्यातील सहकार्याने नियम सुटसुटीत करणे हा गेम-चेंजर ठरणार असून, भारताला लाईव्ह एंटरटेनमेंटच्या जागतिक केंद्रस्थानी नेईल.” – आशीष हेमराजानी, संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी, बुकमायशो.
“अहमदाबादमधील कोल्डप्लेचा कॉन्सर्ट हा एक ऐतिहासिक क्षण ठरला – केवळ गुजरातसाठी नव्हे, तर भारताच्या जागतिक लाईव्ह एंटरटेनमेंट क्षेत्रातील उभरत्या स्थानासाठी. नरेंद्र मोदी स्टेडियमला जागतिक दर्जाच्या संगीत व्हेन्यूमध्ये बदलताना आणि देशभरातून व जगभरातून आलेल्या २.२ लाखांहून अधिक चाहत्यांचं स्वागत करताना, हा क्षण खरोखर ऐतिहासिक ठरला. परिपूर्ण अंमलबजावणी, भव्य प्रमाणात आयोजन आणि सांस्कृतिक उत्सव हे भारताच्या जागतिक पातळीवरील तयारीचं प्रतीक आहे – ज्यामुळे केवळ आर्थिक मूल्यनिर्मिती झाली नाही, तर भारतीय शहरांची ओळखही जागतिक नकाशावर उठून दिसली. आणि हे तर फक्त सुरुवात आहे.” – जय शाह, अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC)
“इतक्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन हे सुरक्षा, वाहतूक आणि आपत्कालीन उपाययोजनांमध्ये अत्यंत काटेकोर नियोजनाची गरज असते. विविध व्यवस्थांची आखणी करून आयोजकांसोबत समन्वय साधण्यात आला, ज्यामुळे उपस्थितांना स्पष्ट सूचना मिळाल्या आणि सुरळीत वाहतूक व सुरक्षिततेची खात्री झाली. शासन यंत्रणा आणि आयोजक यांच्यातील हे सहकार्य दर्शवते की नियोजन आणि भागीदारीमुळे मोठ्या इव्हेंट्सच्या अंमलबजावणीला अधिक उंची देता येते.” – हर्ष संघवी, गृहमंत्री, गुजरात राज्य
“अहमदाबादमधील कोल्डप्लेचा कॉन्सर्ट हा एक ऐतिहासिक क्षण होता – ज्याने गुजरातचं ग्लोबल एंटरटेनमेंट व पर्यटन केंद्र बनण्याच्या क्षमतेला अधोरेखित केलं. अशा मोठ्या कॉन्सर्ट्समुळे केवळ आर्थिक फायदे होत नाहीत, तर आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाला आणि ऊर्जा भरलेल्या आत्म्याला एक मंचही मिळतो. अशा जागतिक कलाकारांचे स्वागत करून आपण सांस्कृतिक देवाणघेवाणीचे नवीन मार्ग उघडत आहोत आणि गुजरातची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित करत आहोत.” – राजेंद्र कुमार (IAS), सचिव (पर्यटन), गुजरात शासन
“कोल्डप्लेचा ‘म्युझिक ऑफ द स्फीयर्स वर्ल्ड टूर’ नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये यशस्वीपणे आयोजित करणे हे मोठ्या स्वरूपाच्या लाईव्ह एंटरटेनमेंटसाठी स्टेडियम इन्फ्रास्ट्रक्चरचा उत्तम वापर करून घेतला गेला, आणि त्याच वेळी स्टेडियमच्या क्रीडा महत्त्वाचंही जतन केलं गेलं. बुकमायशो लाईव्हच्या अत्यंत काटेकोर नियोजनाने, टर्फ संरक्षणासाठी खास कव्हर्स वापरून, खेळपट्टी सुरक्षित ठेवली गेली – ज्यामुळे स्टेडियम वापरासाठी एक नवीन मापदंड तयार झाला आहे. अशा सहकार्यामुळे भारतात जागतिक दर्जाची कार्यक्रमं खेळपट्टीच्या गुणवत्ता बिघडवण्याशिवाय घेता येतील, याचा मार्ग मोकळा झाला आहे.” – धनराज नाथवाणी, अध्यक्ष, गुजरात क्रिकेट असोसिएशन (GCA)