शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

थंडीची लाट; सिमला, मनालीत बर्फवृष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2020 06:11 IST

शनिवारी अनेक ठिकाणी बर्फवृष्टी झाल्याने हिमाचल प्रदेशसह पंजाब व हरियाणा या राज्यांतील थंडीची लाट आणखी तीव्र झाली.

सिमला/चंदीगड : शनिवारी अनेक ठिकाणी बर्फवृष्टी झाल्याने हिमाचल प्रदेशसह पंजाब व हरियाणा या राज्यांतील थंडीची लाट आणखी तीव्र झाली. काश्मिरात तुरळक ठिकाणी हलकी बर्फवृष्टी झाली असतानाच किमान तापमान वाढल्याने थंडीची लाट थोडीशी कमी झाली आहे.हिमाचल प्रदेशातील सिमला आणि मनाली येथे या वर्षातील पहिली बर्फवृष्टी झाली. त्यामुळे संपूर्ण हिमाचल प्रदेश गारठले आहे. बर्फवृष्टीमुळे पर्यटक आणि हॉटेल व्यावसायिक आनंदले आहेत. हवामान खात्याने पिवळा इशारा जारी केला आहे. पिवळा इशारा किमान धोक्याचा संकेतदेतो. राज्यातील बहुतांश पर्यटन स्थळांवरील तापमान शून्याखाली आहे. सिमला, काल्पा, मनाली, डलहौसी, केलाँग यांचा त्यात समावेश आहे. केलाँग येथे सर्वाधिक कमी उणे १0.५ अंश तापमान राहिले. काल्पा येथे उणे ३ अंश, मनाली येथे उणे १.२ अंश, तर डलहौसी येथे उणे 0.६ अंश तापमान राहिले.पंजाब आणि हरियाणातही थंडीची तीव्र लाट असून, ३.६ अंश तापमानासह फरीदकोट हे दोन्ही राज्यांतील सर्वाधिक थंड ठिकाण ठरले आहे. पंजाबातील पतियाळा, अमृतसर, लुधियाना, हलवारा, भटिंडा आणि आदमपूर येथील तापमान ५ अंशांच्या खाली आहे. पठाणकोटमध्ये ६.८ अंश, तर गुरुदासपूरमध्ये ५.५ अंश तापमान राहिले. हरियाणातील कर्नाल आणि अंबाला येथे पारा अनुक्रमे ६.८ आणि ४.५ अंश राहिला. हिसार येथील तापमान ३.८ अंश राहिले. भिवानी, रोहतक, नारनौल, सिरसा ही शहरेही गारठली आहेत. दोन्ही राज्यांची राजधानी असलेल्या चंदीगढमध्ये ६.७ अंश तापमानाची नोंद झाली. अंबाला, कर्नाल, भिवानी, अमृतसर आणि लुधियाना येथे धुके पसरले आहे. काश्मीर खोरे, जम्मू आणि लदाख भागात अनेक ठिकाणी शनिवारी दोन ते पाच इंच बर्फवृष्टी झाली. अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरीही कोसळल्या.>विमान कोसळले; मुंबईच्या दोन पायलटचा मृत्यूमध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यात शुक्रवारी रात्री धुक्यामुळे एक विमान कोसळून दोन पायलटचा मृत्यू झाला. पायलट अशोक मकवाना (५८) आणि पीयूष चंदेल (३०) अशी मृत पायलटसची नावे आहेत. दोघेही मुंबईचे रहिवासी होते. सागरपासून १४ किमीवर हा अपघात झाला. धुक्यामुळे पायलटला रनवेचा अंदाज आला नाही आणि विमान चुकीच्या जागी लँड झाले, असा अंदाज आहे.