शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

युतीचा काडीमोड भाजपाच्या पथ्यावर

By admin | Updated: September 26, 2014 00:09 IST

पाचवरून संख्याबळ नऊ होणार

पाचवरून संख्याबळ नऊ होणारनाशिक : आगामी ४ ऑक्टोबरला होणार्‍या जिल्हा परिषद विषय समिती सभापतिपदासाठी निवडणुकीत भाजपाचे संख्याबळ अचानक चारवरून नऊवर जाण्याची शक्यता बळावली आहे. सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी समर्थकांसह भाजपात प्रवेश केल्याने त्यांचे चार समर्थक जिल्हा परिषद सदस्यही भाजपाच्या गोटात जाण्याची शक्यता आहे.आमदार माणिकराव कोकाटे यांनी भाजपात प्रवेश केल्याने त्यांचे समर्थकही साहजिकच भाजपावासी होणार आहेत. जिल्हा परिषदेत सिन्नर तालुक्यातून आमदार माणिकराव कोकाटे समर्थक चार, तर राष्ट्रवादीचे दोन सदस्य निवडून आले आहेत. त्यातच कोकाटे समर्थक चारपैकी राजेश नवाळे यांना मागील अडीच वर्षांत कॉँग्रेसकडून समाजकल्याण सभापतिपदी संधी मिळाली आहे. तसेच दुसरे समर्थक केरू पवार यांनाही उपाध्यक्षपदासाठी कॉँग्रेसने संधी दिल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रकाश वडजे यांनी त्यांना उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत केले होते. आता आमदार माणिकराव कोकाटे भाजपात गेल्याने त्यांचे समर्थक सदस्य माजी सभापती राजेश नवाळे, केरू पवार, शीला गवारे व ताईबाई गायकवाड हे चारही सदस्य भाजपात जाण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत भाजपाचे केदा अहेर, कलावती चव्हाण, सुनीता पाटील व मनीषा बोडके हे चार, तर अद्वय हिरे हे भाजपात गेल्याने त्यांच्या जनराज्य पक्षाकडून निवडून आलेल्या स्वाती पवन ठाकरे याही भाजपावासी झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपाची संख्या पाच झालेली असतानाच आता आमदार माणिकराव कोकाटे भाजपात गेल्याने त्यांचे चार समर्थकही भाजपावासी झाले तर भाजपाची संख्या आता नऊ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी विषय समिती सभापतिपदासाठी भाजपाकडून उमेदवारी घेऊन प्रसंगी बांधकाम व अर्थ समिती सभापतिपदासाठी जोरदार लॉबिंग होऊ शकते. (प्रतिनिधी)