शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
3
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
4
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
5
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
6
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
7
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
8
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
9
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
10
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
11
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
12
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
13
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
14
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
15
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
16
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
17
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
18
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
19
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
20
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघास सहकारभूषण पुरस्कार

By admin | Updated: June 25, 2015 23:51 IST

फोटो -

फोटो -
सहकारभूषण पुरस्कार उपाध्यक्ष नंदलाल काळे, व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. बी. पाटील यांना देताना हरिभाऊ बागडे.

औरंगाबाद : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघास सहकारभूषण-२०१४ पुरस्कार प्राप्त झाला आहे. कोल्हापूर येथे झालेल्या सहकार मेळाव्यात ही घोषणा करण्यात आल्याची माहिती संघाचे अध्यक्ष तथा विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बागडे म्हणाले, कोल्हापूर येथे नुकताच सहकार मेळावा झाला. त्यात मांजरा सहकारी साखर कारखाना आणि औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध संघाचे सारखे गुण झाले होते. त्यामुळे दोन्ही संस्थांना त्यांची अन्य कामे विचारण्यात आली. औरंगाबाद दूध संघाने गेल्या ५ वर्षांत दूध उत्पादकांना १७.५० कोटी रुपये अतिरिक्त उत्पन्न दिले. या कामगिरीमुळे दूध उत्पादक संघास पुरस्कार मिळाला.
पुढील काळात दूध उत्पादक संघाचे पैठण, वैजापूर, पाथरी व कन्नड येथील कार्यालयांना आयएसओ मानांकन प्राप्त करणे, केंद्र सरकारने घोषित केलेल्या विमा योजनेत १२ रुपये विमा हप्ता भरून सर्व दूध उत्पादकांचा अपघात विमा काढण्यात येणार आहे. ३५ हजार उत्पादकांना या योजनेचा फायदा मिळवून दिला जाईल, असेही बागडे यांनी यावेळी सांगितले.
संघाचे उपाध्यक्ष नंदलाल काळे, व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. बी. पाटील, अनिलकुमार चोरडिया, राजेंद्र जैस्वाल आदींची यावेळी उपस्थिती होती.
चौकट
बारामतीकर दूध उत्पादकांना १७ रुपये भाव देतात
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात बागडे म्हणाले की, दूध उत्पादकांच्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी माझ्या दालनात सर्वपक्षीय बैठक झाली होती. त्यानुसार सरकारने दूध २२.५० दराने खरेदी करण्याचे ठरले. उत्पादकांना किमान २० रुपये भाव मिळावा, असे हे नियोजन आहे. यापेक्षा कमी भाव दिल्यास कारवाईचा इशारा सरकारने दिला आहे; परंतु सध्या असा कोणताही कायदा अस्तित्वात नाही. मागे काही दिवसांपूर्वी अजित पवार यांची भेट झाली तेव्हा ते म्हणाले की, दूध उत्पादकांचा प्रश्न सुटला नाही. बारामती दूध संघ शेतकर्‍यांना १७ रुपये भाव देतो. कारण दूध संघ डायनामिकला हे दूध केवळ १९ रुपये लिटरने विकतो. मी हा प्रश्न अजित पवार यांना विचारला तेव्हा ते म्हणाले पाहून सांगतो. सध्या कोल्हापूर, औरंगाबाद दूध संघ २१ रुपये भाव देतो. मग बारामती का देत नाही, डायनामिकला कमी भावाने दूध का?