शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

Delhi Election 2020 : एक दिवस हनुमान चालिसा वाचताना दिसाल, योगींचा ओवैसींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 16:05 IST

दिल्लीच्या निवडणुकीतील प्रचार शिगेला पोहोचला आहे.

लखनऊः दिल्लीच्या निवडणुकीतील प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजपा आणि आम आदमी पार्टी एकमेकांवर चिखलफेक करण्याची एकही संधी सोडत नाहीत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनीही दिल्लीच्या प्रचारात आघाडी घेतलेली आहे. एका रॅलीला संबोधित करताना योगींनी थेट ओवैसींवर हल्ला चढवला आहे. अरविंद केजरीवाल शाहीन बागमध्ये बिर्याणी खायला देतात आणि हिंदू असल्याचं दाखवण्यासाठी हनुमान चालिसेचं वाचन करतात. राहुल गांधी गुजरातमध्ये मंदिरात पूजा करण्यासाठी गेले होते. परंतु पूजेला कसं बसतात हेच त्यांना माहीत नव्हतं. त्याचदरम्यान मंदिरातल्या पुजाऱ्याला सांगावं लागलं हे मंदिर आहे, मशीद नाही. असाच प्रकार सुरू राहिल्यास एक दिवस ओवैसीसुद्धा हनुमान चालिसा वाचताना दिसतील. देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना केजरीवाल सहानुभूती का देत आहेत. जामिया मिलिया इस्लामिया आणि जेएनयूमध्ये देशविरोधी नारे देणाऱ्यांना केजरीवालांचं समर्थन कशासाठी आहे. तत्पूर्वी कालसुद्धा योगींनी केजरीवालांवर टीका केली होती. दिल्लीच्या करावल नगर चौकात आयोजित करण्यात आलेल्या एका रॅलीला संबोधित करताना योगी आदित्यनाथ यांनी शाहीन बागमध्ये सुरू असलेल्या निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारवरही निशाणा साधला होता. जम्मू-काश्मीरमध्ये जे लोक दहशतवाद्यांचं समर्थन करत आहेत. तेच लोक आता शाहीन बागेत आंदोलने करत आहेत. आझादीच्या घोषणा देत आहेत. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यापासून दहशतवाद्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. मोदी आल्यापासून दहशतवादी बिर्याणी नव्हे तर गोळ्या खात आहेत. लोकशाहीची सर्वात मोठी शक्ती ही बॅलेट आहे, बुलेट नाही. त्यामुळे तुम्ही बॅलेटमधून केजरीवाल सरकारला धडा शिकवा, असं आवाहनही त्यांनी जनतेला केले होतं.  

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीyogi adityanathयोगी आदित्यनाथdelhi electionदिल्ली निवडणूक