शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातचा 'भारत बंद'ला पाठिंबा नाही, जबरदस्ती केल्यास कठोर कारवाई - विजय रूपाणी 

By ravalnath.patil | Updated: December 7, 2020 19:02 IST

Vijay Rupani : गुजरातमधील 23 शेतकरी संघटनांनी गुजरात खेडूत संघर्ष समिती नावाची एक संघटना स्थापन केली असून केंद्रातील तीन नवीन कृषी कायद्याविरोधात 8 डिसेंबरच्या भारत बंदच्या आवाहनाला शेतकऱ्यांनी पाठिंबा दर्शविला आहे.

ठळक मुद्देजयेश पटेल म्हणाले की, आम्ही मंगळवारी शेतकऱ्यांच्या 'भारत बंद'च्या आवाहनाला पाठिंबा दर्शविला आहे.

अहमदाबाद : केंद्र सरकारच्या नव्या तीन कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी 8 डिसेंबरला 'भारत बंद' पुकारला आहे. या शेतकऱ्यांच्या 'भारत बंद'लागुजरातमधील 23 शेतकरी संघटनांनी गुजरात खेडूत संघर्ष समिती नावाची एक संघटना स्थापन करून पाठिंबा दर्शविला आहे. 

यावर प्रतिक्रिया देताना गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी सोमवारी सांगितले की,  शेतकऱ्यांनी केलेल्या 'भारत बंद'च्या आवाहनाला गुजरातचे समर्थन नाही. अशा परिस्थितीत जर कोणी दुकाने आणि इतर संस्था जबरदस्तीने बंद करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.

याचबरोबर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केलेल्या कृषी कायद्यांचा विरोध हा आता फक्त शेतकऱ्यांचे आंदोलन नाही राहिले. तर ते राष्ट्रीय आंदोलन झाले आहे. कारण, उद्या होणाऱ्या 'भारत बंद'मध्ये सर्व मोठ्या पक्षांनी यामध्ये उडी घेतली आहे, असे विजय रूपाणी यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसला सवालमी काँग्रेसला विचारू शकतो की, त्यांनी आपला २०१९ चा जाहीरनामा खुला करून पाहावा. ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते की, जर तुमचा पक्ष सत्तेवर आला तर ते एपीएमसी कायदा रद्द करेल. आज जेव्हा आमचे सरकार हे करीत आहे, तेव्हा राहुल गांधी शेतकऱ्यांना चिथावण्यास सर्वात पुढे का आहेत? असा सवाल मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी केला आहे.

गुजरातमधील शेतकरी संघटनांचे समर्थनगुजरातमधील 23 शेतकरी संघटनांनी गुजरात खेडूत संघर्ष समिती नावाची एक संघटना स्थापन केली असून केंद्रातील तीन नवीन कृषी कायद्याविरोधात 8 डिसेंबरच्या भारत बंदच्या आवाहनाला शेतकऱ्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. गुजरात खेडूत समाजाचे अध्यक्ष जयेश पटेल म्हणाले की, गुजरात खेडूत समाज आणि गुजरात किसान सभेच्या बैठकीत संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

१० डिसेंबरला गुजरातमध्ये निदर्शनेजयेश पटेल म्हणाले की, आम्ही मंगळवारी शेतकऱ्यांच्या 'भारत बंद'च्या आवाहनाला पाठिंबा दर्शविला आहे. १० डिसेंबर रोजी आम्ही गुजरातमध्ये निदर्शने करू आणि एक दिवसानंतर गांधीनगरमधील सत्याग्रह छावणी येथे 'किसान संसद' घेण्याचा निर्णय घेतला आहे. 12 डिसेंबर रोजी शेतकरी येथून दिल्लीकडे कूच करतील व तेथील निदर्शनांमध्ये सहभागी होतील.

टॅग्स :Vijay Rupaniविजय रूपाणीGujaratगुजरातBharat Bandhभारत बंदFarmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरी