शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेशातील 'ही' दोन शहरं पवित्र क्षेत्र म्हणून घोषित; मांस-मद्यविक्रीवर असणार बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 18:09 IST

Madhya Pradesh : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळपासून 285 किमी अंतरावर असलेल्या दमोह जिल्ह्यातील कुंडलपूर (Kundalpur) येथे जैन समाजाच्या  पंचकल्याणक महोत्सवात मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान सहभागी झाले होते.

भोपाळ : मध्य प्रदेशचे (Madhya Pradesh) मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांनी जैन तीर्थक्षेत्र कुंडलपूरसह (Kundalpur) दोन शहरांना 'पवित्र क्षेत्र' म्हणून घोषित केले असून याठिकाणी मांस (Meat) आणि मद्य (Liquor) विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळपासून 285 किमी अंतरावर असलेल्या दमोह जिल्ह्यातील कुंडलपूर (Kundalpur) येथे जैन समाजाच्या पंचकल्याणक महोत्सवात मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी पवित्र शहरांची घोषणा केली. 

आचार्य विद्यासागर (जैन साधू) महाराज यांच्या प्रेरणेने मी कुंडलपूर आणि बांदकपूर ही शहरे पवित्र क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत. त्यामुळे याठिकाणी आता मांस आणि मद्यविक्रीवर पूर्णपणे बंदी असेल, असे  मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले. दरम्यान, बांदकपूर शहर हे शिव मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.

याचबरोबर, विद्यासागर महाराज यांच्या इच्छेनुसार राज्य सरकार वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रम वर्षभरात हिंदीतून सुरू करणार आहे. तसेच नागरिकांनी गायींच्या रक्षणाच्या कामात पुढे यावे आणि चांगल्या पर्यावरणासाठी झाडे लावावीत, असे आवाहनही शिवराज सिंह चौहान यांनी केले.  

दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री विश्वास सारंग यांनी सांगितले होते की, राज्य सरकार पुढील शैक्षणिक सत्रापासून भोपाळ येथील गांधी मेडिकल कॉलेजमध्ये हिंदीत एमबीबीएस अभ्यासक्रम सुरू करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली होती.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहान