शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

हिंसक आंदोलनाला मुख्यमंत्रीच जबाबदार; शिवसेनेचा संसदेत आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 00:06 IST

मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या हिंसाचारासाठी शिवसेना खासदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरले.

नवी दिल्ली : मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या हिंसाचारासाठी शिवसेना खासदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरले. लोकसभेत सेना खासदार विनायक राऊत यांनी मराठा आंदोलनाचा प्रश्न हाताळण्यात राज्य सरकार सपशेल अयशस्वी ठरल्याची आगपाखड केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय महाडिक यांनी राऊत यांचीच रि ओढली. राज्यसभेत छत्रपती संभाजी राजेंनी मराठा समुदायाचे प्रश्न सोडविण्यासाठी दोन सूचना केल्या.औरंगाबादमध्ये एका युवकाने आत्महत्या केली. त्याचा संदर्भ देत राऊत म्हणाले, आरक्षणाच्या मगाणीकडे केवळ न्यायालयाची ढाल करून राज्य सरकार टोलवाटोलवी करीत आहे. आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवा अन्यथा आम्ही जलसमाधी घेणार, असे पत्र मराठा आंदोलकांनी प्रशासनाला दिले होते. मात्र सरकारने त्याची दखल घेतली नाही, त्यामुळेच आताचे आंदोलन चिघळल्याचा थेट आरोप राऊत यांनी केला. महाडिक म्हणाले, मराठा समाजाच्या मागणीचा विचार झाला नाही. आंदोलकांनी इशारा देऊनही प्रशासनाने दखल न घेतल्याने, युवकाने जलसमाधी घेतली.संभाजीराजेंनी मराठीत भाषण केले. ते म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्याने भावना तीव्र झाल्या आहेत. आंदोलन चिघळले आहे. संभाजीराजेंनी दोन सूचना केल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समजातील सर्व घटकांना बोलवून त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात व सर्व राजकीय पक्षांशी त्यासाठी चर्चा करावी, असे पर्याय त्यांनी सुचविले.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv Senaशिवसेना