शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

केवळ 4 तासांत लोकांनी दिला ₹10 लाखांचा निधी...; CM आतिशी यांनी केलं होतं 40 लाख क्राउड फंडिंगचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 16:16 IST

मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री आतिशी यांना 176 देणगीदारांकडून आतापर्यंत 1032000 रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यांना मिळणाऱ्या या मदतीचा ओघ बघता, काही तासांतच 40 लाख रुपयांचा निधी त्यांना मिळून जाईल, असा अंदाज आहे. 

दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी रविवारी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी लोकांकडे मदतीचे आवाहन केले होते. निवडणूक लढवण्यासाठी आपल्याला क्राउड फंडिंगची आवश्यकता असून एकूण ४० लाख रुपये हवे आहेत, असे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या आवाहनानंतर अवघ्या चार तासांतच त्यांना १०,३२,००० रुपयांची देणगी मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री आतिशी यांना 176 देणगीदारांकडून आतापर्यंत 1032000 रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यांना मिळणाऱ्या या मदतीचा ओघ बघता, काही तासांतच 40 लाख रुपयांचा निधी त्यांना मिळून जाईल, असा अंदाज आहे. 

मुख्यमंत्र्यांनी केलं होतं असं आवाहन -दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी म्हणाल्या होत्या की, निवडणूक लढवण्यासाठी आपल्याला 40 लाख रुपयांची आवश्यकता आहे. यासाठी आपण आम्हाला 100 ते 1000 रुपयांपर्यंतची मदत करू शकतात. यामुळे निवडणूक लढण्यास मदद होईल.

'देशभरातून लोकांनी आपल्याला मदत केली' -जनतेला आवाहन करताना आतिशी म्हणाल्या होत्या, "यापूर्वीही दिल्लीच्या जनतेने आपला समर्थन दिले आहे. लोकांच्या छोट्या छोट्या सहकार्याने आम्हाला निवडणूक लढवण्यास आणि जिंकण्यास मदत झाली आहे. दिल्लीतील सर्वात गरीब लोकांनी आम्हाला १० ते १०० रुपयांपर्यंत, अशा छोट्या देणगीच्या सहाय्याने समर्थन दिले आहे." याशिवाय, दिल्लीच नव्हे तर, देशभरातून लोकांनी आपल्याला मदत केली आहे, असेही आतिशी यांनी म्हटले होते.

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025AtishiआतिशीAam Admi partyआम आदमी पार्टी