शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

उत्तराखंडात ढगफुटी

By admin | Updated: July 2, 2016 05:22 IST

उत्तराखंडमधील पिठोरागड आणि चमोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि ढगफुटीमुळे हाहाकार उडाला

पिठोरागड, गोपेश्वर : उत्तराखंडमधील पिठोरागड आणि चमोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि ढगफुटीमुळे हाहाकार उडाला असून, तिथे किमान ३0 जणांचा मृत्यू झाला आहे. भुईसपाट झालेल्या घरांच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक दबून मरण पावले असावेत, असे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत ते बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत असले तरी स्थानिकांच्या म्हणण्यानुसार ते दबून मेले आहेत वा वाहून गेले आहेत. या प्रकारांमुळे उत्तराखंडातील लोकांमध्ये घबराट पसरली असून, दोन वर्षांपूर्वी अशाच नैसर्गिक आपत्तीमुळे होत्याचे नव्हते झाले होते, तसेच आताही होते की काय, अशी शंका त्यांना वाटत आहे. ढगफुटी आणि जोरदार पावसामुळे अलकनंदा नदी धोक्याच्या पातळीच्या वर वाहत असून, अनेक भागांत पुरामुळे घरे पाण्याखाली गेली आहेत. रस्तेही अनेक ठिकाणी खचले असून, तेथील राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. अधिकृत सूत्रांनुसार, पिठोरागड जिल्ह्याच्या सिंघली भागात ढगफुटीमुळे ८ लोक मृत्युमुखी पडले, तर २५ जण बेपत्ता आहेत.>मदतकार्यासाठी केंद्रीय पथके रवानाकेंद्राने उत्तराखंडमधील बचाव व मदतकार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) पथके शुक्रवारी रवाना केली असून, या राज्याला आवश्यक ती सर्व मदत पुरविण्याची ग्वाही दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी मुख्यमंत्री हरीश रावत यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला. परिस्थिती हाताळण्यासाठी शक्य ती सर्व मदत करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी रावत यांना दिली.एनडीआरएफची काही पथके आपत्तीग्रस्त भागात पाठविण्यात आली असून, आणखी काही पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत, असे राजनाथसिंह यांनी रावत यांना सांगितले. जखमींना त्वरित उपचार उपलब्ध : मुख्यमंत्री हरीश रावत यांनी प्रशासनाला जखमींना त्वरित उपचार उपलब्ध करून देण्याचे, तसेच संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना मदत आणि बचाव कार्याला गती देण्याचे आदेश दिले. याशिवाय त्यांनी गढवाल आणि कुमाऊ या दोन्ही विभागाच्या आयुक्तांना आपत्तीग्रस्त भागातील बचाव व मदतकार्याची स्वत: देखरेख करण्यास सांगितले. पीडितांच्या मदतीसाठी हेलिकॉप्टरही पुरविले जात आहे. >ढगफुटीमुळे पिठोरागड जिल्ह्यातील अनेक घरे भुईसपाट‘सिंहली भागात पाच, तर थल गावात तीन मृतदेह हाती लागले असून, लष्कर व निमलष्करी दलाच्या मदतीने इतर मृतदेहांचा शोध सुरू आहे,’ असे पिठोरागडचे जिल्हाधिकारी म्हणाले.ढगफुटीचा तडाखा बसलेल्या गावांतील बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी संपूर्ण परिसर पिंजून काढण्यात येत आहे. ढगफुटीमुळे पिठोरागड जिल्ह्यातील सात गावांत अनेक घरे भुईसपाट झाली.>पंतप्रधानांना दु:खपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमध्ये ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. मी पीडित कुटुंबांच्या दु:खात सहभागी असून, तेथील जनजीवन लवकरच पूर्वपदावर येईल, अशी आशा करतो, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. >मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाखमुख्यमंत्री हरीश रावत यांनी मुसळधार पाऊस, ढगफुटी व दरडी कोसळण्याच्या घटनांतील जीवितहानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान घोषित केले. ही दु:खद घटना असून, राज्य सरकार पीडितांसोबत आहे, असे ते म्हणाले.