शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

नरेंद्र मोदी आणि ललित मोदी यांचे जवळचे संबंध

By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST

पृथ्वीराज चव्हाण : ललित मोदींचा ई-मेल उघड

पृथ्वीराज चव्हाण : ललित मोदींचा ई-मेल उघड
पुणे : नरेंद्र मोदी यांची गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आयपीएलचे तत्कालीन अध्यक्ष ललित मोदी यांनी त्यांच्या एका सहकार्‍याला ई-मेल पाठविला होता. त्यामध्ये मोदी यांच्याशी माझे अतिशय जवळचे संबंध आहेत, आपल्याला पाहिजे ते करतील असा उल्लेख ललित मोदी यांनी केला आहे. तो ई-मेल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये उघड केला.
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज व राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी ललित मोदी यांना भारतातून पळून जाण्यासाठी मदत केल्याप्रकरणी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांचेही ललित मोदींशी जवळचे संबंध असून त्यांच्या सांगण्यावरूनच सुषमा स्वराज यांनी ललित मोदी यांना मदत केल्याची शक्यता चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. सुषमा स्वराज, वसुंधरा राजे व शिवराजसिंह चौहान यांची सखोल चौकशी करण्यात यावी, चौकशी पूर्ण होईपर्यंत या तिघांनी राजीनामे देणे आवश्यक आहे. ते राजीनामे देत नाहीत तोपर्यंत काँगे्रसकडून आणखी तीव्र आंदोलन केले जाणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
चव्हाण म्हणाले, 'नरेंद्र मोदी यांची १५ सप्टेंबर रोजी गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली, त्याच्या दुसर्‍या दिवशी ललित मोदी यांनी शंतनुचारी यांना एक ई-मेल पाठविला. त्यामध्ये ललित मोदी यांनी नरेंद्र मोदी यांच्याशी माझे जवळचे संबंध असून ते आपल्याला पाहिजे ते करतील असे नमूद केले आहे. त्यानंतर बीसीसीआयकडून गुजरात क्रिकेट असोसिएशनला २२ कोटी रूपये दिले गेले.'
भूमि अधिग्रहण कायद्यामध्ये केंद्रातील भाजप सरकारने अध्यादेश काढून बदल केला आहे. त्यामुळे उद्योगपती व बिल्डरांना फायदा होणार आहे. या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर न झाल्यामुळे तो आता रद्द झालेला आहे.
...तर जीएसटी मंजूर होईल
देशभरात एकच करप्रणाली लागू व्हावी याकरिता यूपीए सरकारनेच जीएसटी विधेयक तयार केले, त्यानंतर भाजपचे सरकार आल्यानंतर त्यांनी त्यामध्ये काही बदल केले आहेत. विरोधी पक्ष म्हणून त्यांनी त्या बदलांविषयी काँग्रेसला काहीही माहिती दिली नाही. भाजपने जीएसटी कायद्याबाबत काँग्रेसला विश्वासात घेतल्यास जीएसटी कायदा मंजूर व्हायला अडचण येणार नाही. विशेष अधिवेशन बोलावून हा कायदा मंजूर करता येईल, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.
---