शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

मोदींना क्लीन चिट!, झकिया जाफरी यांची याचिका फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 04:58 IST

गोध्रा हत्याकांडानंतर २००२ मध्ये अहमदाबादमधील गुलबर्ग सोसायटीत झालेल्या दंगलीच्या गुन्ह्यात तेव्हाचे मुख्यमंत्री व आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही आरोपी करून अधिक तपास केला जावा...

अहमदाबाद : गोध्रा हत्याकांडानंतर २००२ मध्ये अहमदाबादमधील गुलबर्ग सोसायटीत झालेल्या दंगलीच्या गुन्ह्यात तेव्हाचे मुख्यमंत्री व आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही आरोपी करून अधिक तपास केला जावा, यासाठी केलेली याचिका गुजरात उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली.गुलबर्ग सोसायटी दंगलीत माजी काँग्रेस खासदार एहसान जाफरी यांच्यासह ६८ जण ठार झाले होते. त्या वेळी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. गोध्रा हत्याकांडानंतरच्या गुजरातमधील इतर दंगलींसोबत या दंगलीचा तपासही सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या विशेष तपासी पथकाने (एसआयटी) केला होता. या दंगलीमागे व्यापक कट होता आणि मोदींसह काही वरिष्ठ नेते व पोलीस अधिकाºयांच्या आशीर्वादानेच ती दंगल झाली होती, अशी फिर्याद जाफरी यांच्या पत्नी झकिया जाफरी यांनी केली होती.एसआयटीने फेब्रुवारी २०१२ मध्ये मोदींसह इतरांना ‘क्लीन चिट’ देणारा तपासी अहवाल दंडाधिकारी न्यायालयास सादर केला. त्यास आक्षेप घेणारा अर्ज झकिया जाफरी यांनी केला होता. दंडाधिकाºयांनी तो डिसेंबर २०१३ मध्ये फेटाळला. याविरुद्ध जाफरी व सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांच्या ‘सिटिझन्स फोरम फॉर जस्टिस अ‍ॅण्ड पीस’ या संस्थेने केलेली फेरविचार याचिका उच्च न्यायालयाच्या न्या. सोनिया गोकानी यांनी फेटाळली.जाफरी यांच्या वतीने ज्येष्ठ वकील मिहीर देसाई यांनी युक्तिवाद केला होता की, दंडाधिकाºयांनी एसआयटीचा अहवाल फक्त स्वीकारण्याच्या दृष्टीनेच विचार केला. अहवाल फेटाळणे आणि अधिक तपासाचा आदेश देणे यांसारख्या पर्यायांचा त्यांनी साकल्याने विचारही केला नाही. याखेरीज संजीव भट, आर. बी. श्रीकुमार व राहुल शर्मा या आयपीएस अधिकाºयांच्या जबान्या, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या साक्षी इत्यादींकडे त्यांनी दुर्लक्ष केले. ही दंगल टाळता येऊ शकली असती. पण काही मंत्री व वरिष्ठ सरकारी अधिकाºयांनी या कटास साथ दिली, असे सुचविणाºया साक्षीही त्यांनी विचारात घेतल्या नाहीत. (वृत्तसंस्था)एसआयटीने न्यायालयास असे सांगितले की, हा तपास खुद्द सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करण्यात आला होता. या दंगलीमागे मोठे कारस्थान होते का, यादृष्टीने आणखी तपास करण्याची गरज नाही, हा निष्कर्ष दंडाधिकाºयांनी सर्व बाबींचा संगतवार विचार करूनच काढला होता. न्या. गोकाणी यांनी दंडाधिकाºयांचा निर्णय योग्य ठरवून जाफरी यांची याचिका अमान्य केली. ३ जुलै रोजी युक्तिवाद संपल्यानंतर राखून ठेवलेला निकाल गुरुवारी जाहीर केला गेला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGulbarga Societyगुलबर्गा सोसायटीGujarat Riots 2002गुजरात दंगल 2002