शहरं
Join us  
Trending Stories
1
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
2
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
5
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
6
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
7
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
8
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
9
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
10
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
11
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
12
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
13
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
14
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
15
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
16
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
17
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
18
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
19
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
20
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार

काश्मिरात चकमक; दुसरा जवान शहीद, ६ अतिरेक्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 05:38 IST

घुसखोरीमागे इस्लामाबादच्या कॅम्पमध्ये कार्यरत लष्कर-ए-तोयबाचा हस्तक

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात झालेल्या दोन चकमकींत सहा दहशतवादी ठार झाले असून, दोन जवान शहीद झाले. दोन दहशतवाद्यांचे मृतदेह मोदरगाम चकमकीच्या ठिकाणी आढळले; तर रविवारी चिन्निगाम येथून चार मृतदेह ताब्यात घेतले. कुलगाम जिल्ह्यातील दोन गावांमध्ये शनिवारी ही चकमक झाली. अमरनाथ यात्रा सुरू असताना हा हल्ला झाला असून, सुरक्षा वाढविली आहे. दहशतवाद्यांशी चकमकीत दोन जवान शहीद झाले आहेत. या कारवाईबाबत बोलताना जम्मू आणि काश्मीरचे पोलिस महासंचालक आर. आर. स्वैन म्हणाले की, एवढ्या मोठ्या संख्येने दहशतवाद्यांचा खात्मा करणे हे मोठे यश आहे. दहशतवाद संपवण्याची लढाई अंतिम टप्प्यात पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  

सैफुल्लाह जट कोण?

घुसखोरीमागे सैफुल्लाह साजिद जट या अतिरेक्याचा हात आहे. जट हा पाकिस्तानच्या कसूर जिल्ह्यातील शांगमंगा गावचा असल्याचे एनआयएने म्हटले आहे. तो इस्लामाबादमधील बेस कॅम्पमध्ये कार्यरत आहे. त्याची पत्नी भारतीय वंशाची आहे. 

एनआयएकडून एकाला अटक 

दहशतवादी आणि अमली पदार्थांचा पुरवठा करणारे यांच्या हातमिळवणी प्रकरणात एनआयएने रविवारी सय्यद सलीम जहांगीर अंद्राबी यास अटक केली आहे. 

बाबा घरासाठी पैसे पाठवलेत; शहीद प्रवीणचे अंतिम शब्द

कुलगाम येथे चकमकीत मोरगाव भाकरे येथील जवान प्रवीण जंजाळ हे शहीद झाल्यानंतर ग्रामस्थांनी शनिवारची रात्री जागून काढली.   प्रवीण यांनी शुक्रवारी सायंकाळी कुटुंबीयांशी संपर्क साधला होता. त्यांची आई शालूबाई घरी नव्हत्या. त्यामुळे वडील प्रभाकरराव त्यांच्याशी बोलले. घराचे बांधकाम सुरू आहे. त्यासाठी पैसे पाठवल्याचे प्रवीण यांनी वडिलांना सांगितले. चकमकीत प्रवीण यांना मानेजवळ गोळी लागली. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीIndian Armyभारतीय जवान