शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवासाठी शहर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

By admin | Updated: September 5, 2016 01:31 IST

नाशिक : गणेशोत्सव कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी शहर पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवला जाणार आहे़ शहरात बंदोबस्तासाठी स्थानिक पोलिसांबरोबरच अतिरिक्त २०० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार असून, गणेशोत्सवात चार दिवस रात्री बारा वाजेपर्यंत मंडळांना म्युझिक सिस्टीम लावण्यास पोलिसांनी परवानगी दिली आहे़

नाशिक : गणेशोत्सव कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी शहर पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवला जाणार आहे़ शहरात बंदोबस्तासाठी स्थानिक पोलिसांबरोबरच अतिरिक्त २०० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार असून, गणेशोत्सवात चार दिवस रात्री बारा वाजेपर्यंत मंडळांना म्युझिक सिस्टीम लावण्यास पोलिसांनी परवानगी दिली आहे़लाडक्या गणरायाचे सोमवारी (दि़५) आगमन होणार असून, या कालावधीत शहरात विविध मंडळातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे़ या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी शहरातील तेराही पोलीस ठाण्यांतील अधिकारी व कर्मचारी तैनात असणार आहे़ शहरातील वर्दळीची ठिकाणे, बसस्थानके, तसेच महत्त्वाच्या व मौल्यवान गणेश मंडळांभोवती पोलीस बंदोबस्त तसेच बॉम्बशोधक पथकाकडून तपासणी केली जाणार आहे़पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त दत्तात्रय कराळे, लक्ष्मीकांत पाटील, श्रीकांत धिवरे यांच्यासह सर्व सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक व पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात असणार आहे़ या व्यतिरिक्त दोनशे पोलीस कर्मचारी, सीआरपीएफची एक तुकडी तैनात केली जाणार आहे़ चार दिवस रात्री बारा वाजेपर्यंत परवानगीगणेशोत्सव कालावधीत ९, ११, १४ व १५ सप्टेंबर हे चार दिवस गणेशोत्सव मंडळांना म्युझिक सिस्टिमसाठी रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी असणार आहे़ या कालावधीत मंडळांनी आपले म्युझिक सिस्टीमचा आवाज हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मर्यादेपर्यंत ठेवण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)