शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
4
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
5
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
6
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
7
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
8
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
9
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
10
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
11
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
12
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
13
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
14
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
16
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
17
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
18
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
19
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
20
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
Daily Top 2Weekly Top 5

CAA : नागरिकत्व कायद्याविरोधात विद्यार्थी आक्रमक; दिल्लीनंतर लखनऊ, हैदराबाद, मुंबईत आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 12:40 IST

जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थी आजही आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. 

मुंबई : संसदेने गेल्या आठवड्यात मंजूर केलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधातील आंदोलनाने प. बंगाल व ईशान्येकडील राज्ये धुमसत असताना, रविवारी देशाच्या राजधानीतही या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यानंतर आता लखनऊ, मुंबईसह देशभरातील विविध भागात आंदोलन सुरु आहे. 

दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या लायब्ररीत बसून पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा निषेध विद्यार्थी करत आहेत. तसेच, जामिया विद्यापीठातील विद्यार्थी आजही आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाचे पडसाद उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्येही उमटले. येथील नदवा कॉलेजमध्ये सोमवारी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. मोठ्या संख्येने विद्यार्थी आंदोलन करत आहेत. यावेळी विद्यार्थ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना घडली.  

दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमारानंतर अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी याचा निषेध केला. यावेळी पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादानंतर विद्यापीठ प्रशासनाने सुट्या जाहीर केल्या आहेत. दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने सहारनपूर, बरेली, अलिगड, बुलंदशहर, कासगंजसह 6 जिल्ह्यात कलम 144 लागू केला आहे. या जिल्ह्यांमध्ये कलम 144चे काटेकोरपणे पालन करावे, असे प्रशासनाने आदेश दिले आहेत.

मुंबईत टाटा इन्सिट्यूट ऑफ सोशल सायन्स(टीस)च्या विद्यार्थ्यांनी सुद्धा सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन सुरु केले आहे. याशिवाय, आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनी रविवारी रात्री हातात मशाली घेऊन रॅली काढत जामियातील आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तसेच, आंदोलनाच्या समर्थनार्थ विद्यार्थ्यांनी काढलेल्या रॅलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. ट्विटरवर #IITBombay असा हॅशटॅग ट्रेंड झाला आहे. यात अनेकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. तर काहीजणांनी टीकाही केली आहे.

हैदराबादमधील मौलाना आझाद नॅशनल उर्दू युनिव्हर्सिटीमध्येही नागरिकत्व कायद्याविरोधात विद्यार्थी आंदोलन करत आहेत. तसेच, त्यांनी जामिया विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. 

दुसरीकडे, केरळमधील केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथला यांचेही नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन सुरु आहे. सध्याची स्थिती भाजपा आणि संघामुळे निर्माण झाली आहे. आपला अजेंडा लागू करण्याचा प्रयत्न भाजपाकडून करण्यात येत आहेत. देशात अस्थिरता आहे. केरळ नागरिकत्व कायद्याविरोधात एकत्र आहे, असे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यावेळी सांगितले. 

 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकMumbaiमुंबईdelhiदिल्लीUttar Pradeshउत्तर प्रदेश