शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 05:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : नागरिकांना भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मूल्य माहिती असले पाहिजे. आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्ट ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : नागरिकांना भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मूल्य माहिती असले पाहिजे. आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्ट नियंत्रित करण्याबाबत मार्गदर्शन तत्त्वे तयार करतानाच आत्मसंयम बाळगला पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी म्हटले आहे.

हिंदू देवतांविरुद्ध एक्सवर पोस्ट केल्याबद्दल पश्चिम बंगालसह अनेक राज्यांत एफआयआर दाखल झालेल्या वजाहत खान याच्या याचिकेवर न्या. बी. व्ही. नागरत्ना व न्या. के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने सुनावणी घेतली. मूलभूत कर्तव्यांपैकी एक म्हणजे भारत देशाची एकता व अखंडता राखणे होय.

सरकारने हस्तक्षेप करावा, असे कोणाला वाटते ? किमान सोशल मीडियावर तरी या सर्व फुटीर प्रवृत्तींना आळा घालायला हवा. परंतु सरकार किती अंकुश लावू शकते ? त्याऐवजी नागरिक स्वत:चेच नियमन करू शकत नाहीत का ? नागरिकांना भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मूल्य माहीत असले पाहिजे. जर त्यांनी त्याचे उल्लंघन केले तर सरकार हस्तक्षेप करील. परंतु, सरकारने हस्तक्षेप करावा, असे कोणाला वाटते ? सरकारने यात पडावे, असे कोणालाही वाटत नाही, असे पीठाने म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने खान याला कारवाईपासून अंतरिम संरक्षण दिले आहे. २३ जूनला याबाबत आदेश देण्यात आले होते. त्याने सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर शर्मिष्ठा पनोलीविरुद्ध तक्रार दाखल केली होती. न्या. नागरत्ना यांनी म्हटले की, सरकार पावले उचलू शकते. सोशल मीडियावरील विभाजनकारी प्रवृत्ती रोखली पाहिजे.

भाषण हा मूलभूत अधिकारपीठाने म्हटले की, भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा मूलभूत अधिकार आहे. जर नागरिकांना हा मूलभूत अधिकार उपभोगायचा असेल तर त्यांना संयम बाळगावा लागेल.न्या. विश्वनाथन यांच्या निरीक्षणांचा संदर्भ देत न्या. नागरत्ना यांनी सांगितले की, नागरिकांत बंधुभाव असला पाहिजे तर हा सर्व द्वेष कमी होईल.आपण सेन्सॉरशिपबाबत बोलत नाहीत. परंतु बंधुत्व, धर्मनिरपेक्षता व व्यक्तींच्या प्रतिष्ठेच्या हितासाठी आपल्याला या याचिकेच्या पलीकडे जावे लागेल.

प्रकरण काय ?वजाहत खान याला ९ जूनला कोलकाता पोलिसांनी अटक केली होती. मी जुने सर्व ट्वीट हटविले आहेत व माफीही मागितलेली आहे. त्याने जे केले, त्याची फळे भोगत आहे, असेही खानच्या वकिलांनी म्हटले आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय