शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

बालाकोट एअरस्ट्राइकवर प्रश्न विचारण्याचा प्रत्येक नागरिकाचा अधिकार- हमीद अन्सारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 09:30 IST

देशाचे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारींनी बालाकोट एअर स्ट्राइकवर नागरिकांना प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार असल्याचं म्हटलं आहे.

नवी दिल्ली- देशाचे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारींनी बालाकोट एअर स्ट्राइकवर नागरिकांना प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार असल्याचं म्हटलं आहे. बालाकोट एअरस्ट्राइक का करण्यात आलं आणि त्याचा देशाला कोणता फायदा झाला, असे प्रश्न लोक विचारू शकतात. सरकारनंही या प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत. एका माध्यम प्रतिनिधीशी बातचीत करताना त्यांनी हे विधान केलं आहे. मुलाखतीदरम्यान हमीद अन्सारींनी नागरिकांच्या काही मूलभूत अधिकारांबाबतही आवाज उठवला. देशाचं परराष्ट्र धोरण आणि सुरक्षेशी संबंधित असलेल्या गोष्टींवर प्रत्येक नागरिकाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे.अन्सारी म्हणाले, तुम्ही कोणतेही पुरावे लपवू शकत नाही. भारतानं पाकिस्तानचं एफ 16 विमान पाडल्याचा दावा फेटाळल्यावरही त्यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, जर मी दावा करत आहे की वाघाला मारलं, तर मला मारलेला वाघ दाखवावा लागेल. तसेच अन्सारी यांनी मोदींवरही टीका केली आहे. मोदींनी सुरुवात जोरात केली होती, परंतु जनतेला दिलेली आश्वासनं त्यांनी पूर्ण केलेली नाहीत. तर गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी मुस्लिम असुरक्षित असल्याचंही म्हटलं होतं. देशातील मुस्लिमांमध्ये अस्वस्थतेची जाणीव आणि असुरक्षततेची भावना असल्याचं वक्तव्य हमीद अन्सारी यांनी केलं होतं. देशात असहिष्णुता आणि स्वयंघोषित गोरक्षकांकडून होणा-या हल्ल्यांच्या घटना समोर येत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं होतं.राज्यसभा टीव्हीवर दिलेल्या मुलाखतीत बोलताना केलेल्या या विधानातून त्यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर एक प्रकारे टीकाच केली होती.  हमीद अन्सारी यांनी सांगितलं होतं की, 'असहिष्णुतेचा मुद्दा मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रीमंडळातील सहका-यांसमोर उपस्थित केला आहे'. देशातील नागरिकांच्या राष्ट्रीयत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणं अत्यंत विचलित करणारं असल्याचंही ते बोलले आहेत. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी आपला कार्यकाळ संपत असतानाच असं वक्तव्य केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.