शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जामिया विद्यापीठ हिंसाचार प्रकरण: सहा आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 18:52 IST

सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन वातावरण पेटलं

नवी दिल्ली: जामिया मिलिया विद्यापीठातील हिंसक आंदोलनादरम्यान अटक करण्यात आलेल्या ६ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दिल्लीतल्या साकेत न्यायालयानं आरोपींना ३१ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावली. न्यायालयीन सुनावणीदरम्यान आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं. आरोपींना त्यांच्या पार्श्वभूमीवरुन ताब्यात घेण्यात आल्याचा युक्तिवाद यावेळी बचाव पक्षाकडून करण्यात आला. आरोपींविरोधात याआधीही गुन्हे दाखल झाले होते का, अशी विचारणा न्यायमूर्तींनी केली. त्यावर आरोपी याआधी अशाच प्रकारच्या प्रकरणांमध्ये आरोपी होते, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. पोलिसांनी जामिया हिंसाचार प्रकरणात १० जणांना अटक केली होती. यामधील एकही जण विद्यार्थी नव्हता. या प्रकरणात पोलिसांनी आम आदमी पार्टीचा एक आमदार आणि काही इतर व्यक्तींची चौकशी सुरू केली आहे. ते दोषी आढळल्यास त्यांच्यावरदेखील कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी विद्यापीठाच्या ग्रंथालयात घुसून मारहाण आणि गोळीबार केल्याचा आरोप जामियाच्या विद्यार्थ्यांनी केला होता. घटनास्थळावर एक काडतूस सापडल्याची माहिती गृह मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यानं दिली होती. मात्र पोलिसांकडून गोळीबार झाल्याचा आरोप त्यानं फेटाळला. पोलिसांकडे रबराच्या गोळ्यादेखील नव्हत्या, असं या अधिकाऱ्यानं सांगितलं. रविवारी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात जामियाच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. यावेळी एक बस पेटवून देण्यात आली. यानंतर पोलिसांनी पूर्वपरवानगीशिवाय विद्यापीठ परिसरात प्रवेश करुन कारवाई केली. 

 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक