शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

CAA: रेल्वेच्या मालमत्तेचं नुकसान करणाऱ्यांना गोळ्या घाला; राज्यमंत्र्यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 21:38 IST

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश आंगडी यांच्या प्रशासनाला सूचना

नवी दिल्ली: सध्या देशभरात सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलनं सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश आंगडी यांनी रेल्वे प्रशासनाला कठोर आदेश दिले आहेत. आंदोलनादरम्यान कोणीही रेल्वेच्या मालमत्तेचं नुकसान करत असल्यास त्याला जागेवरच गोळ्या घालण्याच्या सूचना आंगडींनी दिल्या आहेत. जर कोणीही सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करताना दिसला, तर त्याला त्याच क्षणी गोळ्या घाला, असे आदेश जिल्हा आणि रेल्वे प्रशासनाला दिल्याची माहिती आंगडी यांनी दिली. सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनांदरम्यान पश्चिम बंगालसह इतर अनेक राज्यांमध्ये आंदोलकांनी रेल्वेच्या संपत्तीचं नुकसान केल्याबद्दल आंगडी यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्या प्रश्नाला उत्तर देताना आंगडी यांनी प्रशासनाला सूचना दिल्याचं सांगितलं. रेल्वे सर्वसामान्य जनतेनं भरलेल्या कररुपी पैशांवर चालते आणि एक ट्रेन तयार करायला अनेक वर्षे लागतात, असं आंगडी म्हणाले. कोणीही दगडफेक केल्यास वल्लभभाई पटेल यांच्याप्रमाणे कठोर कारवाई व्हायला हवी. काही स्थानिक अल्पसंख्यांक आणि समुदाय कारण नसताना देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत, असं राज्यमंत्री आंगडी यांनी म्हटलं. सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात सध्या देशभरात आंदोलनं सुरू आहेत. त्यामुळे रेल्वेच्या पूर्व विभागानं १९ रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक