शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
Daily Top 2Weekly Top 5

CISF जवानांना सरकारला द्यावे लागणार FB, Twitter अकाऊंट आयडी, अन्यथा होणार कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2020 21:25 IST

नवीन मार्गदर्शक सूचना 31 जुलै रोजी जारी करण्यात आल्या. जे या नियमांचे उल्लंघन करतील, त्यांना कठोर कायदेशीर आणि शिस्तभंगाच्या कारवाईस सामोरे जावे लागेल.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल/सीआयएसएफ (ICSF)ने आपल्या 1.62 लाख कर्मचार्‍यांना सोशल मीडियाच्या वापरासंदर्भात काही नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. याअंतर्गत ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्राम यांसारख्या सर्व सोशल मीडिया माध्यमांवरचा 'यूजर आयडी' संस्थेला जाहीर करण्याचे निर्देश कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत, असं अधिकृत आदेशाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. नवीन मार्गदर्शक सूचना 31 जुलै रोजी जारी करण्यात आल्या. जे या नियमांचे उल्लंघन करतील, त्यांना कठोर कायदेशीर आणि शिस्तभंगाच्या कारवाईस सामोरे जावे लागेल.दिल्लीतील सीआयएसएफ मुख्यालयाने जारी केलेल्या आदेशात असे म्हटले आहे की, राष्ट्रीय सुरक्षा आणि सैन्याच्या शिस्तीला येणारा धोका लक्षात घेता या ऑनलाईन माध्यमांकडून दोन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जात आहेत. सीआयएसएफचे कर्मचारी सध्या देशातील 63 विमानतळं, विमानतळांशी संबंधित काही महत्त्वपूर्ण मालमत्तांसह देशातील विविध सरकारी मंत्रालये आणि इमारती इत्यादींचे संरक्षण करतात. मार्गदर्शक तत्त्वांच्या सूचनांनुसार, हे जारी केले गेले आहे. कारण सीआयएसएफचे जवान सोशल मीडिया माध्यमाचा वापर करून राष्ट्र/संघटनांबद्दल संवेदनशील माहिती सामायिक करत आहेत आणि सरकारच्या धोरणांना विरोध दर्शवित आहेत.सीआयएसएफ जवानांना ५ नियमांचं करावं लागणार पालननवीन मार्गदर्शक सूचनांमध्ये सीआयएसएफ कर्मचार्‍यांच्या अनुपालनासाठी पाच मुद्दे निश्चित केले गेले आहेत, जे ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, यू ट्युब यांसारख्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्वतःचे यूजर आयडी वापरणारे कर्मचारी आहेत. त्यांना विभागाला त्यासंदर्भात खुलासा करावा लागेल. मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केले आहे की, 'यूजर आयडी'मध्ये काही बदल झाल्यास किंवा नवीन बनल्यास त्यांनी त्याबाबत विभागाला कळवावेयात म्हटले आहे की, कर्मचारी अज्ञात किंवा खोट्या नावाने यूजर आयडी वापरणार नाहीत आणि ते 'कोणत्याही प्रकारे सरकारच्या धोरणांवर टीका करण्यासाठी' या ऑनलाईन माध्यमांचा वापर करणार नाहीत. मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे की, "सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा उपयोग तक्रारी व्यक्त करण्यासाठी पदानुक्रम किंवा योग्य मार्गाकडे दुर्लक्ष करण्यासाठी केला जाणार नाही." सोशल मीडिया यूजर्स पॉलिसीची अंमलबजावणी सर्वप्रथम 2016 मध्ये करण्यात आली होती आणि ती 2019 मध्ये सुधारित करण्यात आली होती.