ख्रिश्चन आणि मुस्लिमांमुळे युद्ध - अशोक सिंघल
By admin | Published: December 21, 2014 01:17 PM2014-12-21T13:17:05+5:302014-12-21T13:18:24+5:30
विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांनी जगभरातील युद्धांसाठी ख्रिश्चन आणि मुस्लिमच कारणीभूत असतात असे वादग्रस्त विधान करुन वादात भर टाकली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २१ - धर्मांतराचा मुद्दा गाजत असतानाच विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांनी जगभरातील युद्धांसाठी ख्रिश्चन आणि मुस्लिमच कारणीभूत असतात असे वादग्रस्त विधान करुन वादात भर टाकली आहे. विहिंपच्या घर वापसीचे समर्थन करताना आम्ही धर्मपरिवर्तन नव्हे तर लोकांची मन जिंकायला निघालो असे त्यांनी म्हटले आहे.
अशोक सिंघल यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये धर्मांतरावर भाष्य केले. मुस्लिम आणि ख्रिश्चन हे युद्धातील आघाडीचे खेळाडू आहेत, पण हिंदू धर्म त्यांच्यापेक्षा वेगळा आहे. जगात युद्ध टाळणे अशक्य झाले असून संपूर्ण जगच आता इस्लामी दहशतवादाच्या सावटाखाली आहे असे सिंघल यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांमध्ये धर्म आणि संस्कृतीला गुलाम बनवले होते, मात्र आता हिंदूंचे रक्षण करणारे सरकार केंद्रात आले आहे असे सांगत सिंघल यांनी मोदींच्या कामाचे कौतुक केले.
धर्मांतरासंदर्भात वादग्रस्त विधानांची मालिका सुरु असल्याने मोदी सरकारची चोहोबाजूंनी कोंडी झाली आहे. आता सिंघल यांनी पुन्हा वादग्रस्त विधान करुन या वादात आणखी भर टाकून मोदींची डोकेदुखी वाढवली आहे.