हैदराबाद: भारतीय जनता पार्टीनं त्यांच्या अधिकृत वेबसाईटसाठी टेम्प्लेट चोरल्याचा आरोप आंध्र प्रदेशातील एका वेब डिझाईन कंपनीनं केला आहे. भाजपानं कोणतंही क्रेडिट न देता टेम्प्लेटची बॅकलिंक काढून टाकल्याचा आरोप डब्ल्यूथ्रीलेआऊट्सनं (W3Layouts) केला. भाजपानं टेम्प्लेटसाठी कोणतंही क्रेडिट दिलं नाही. उलट त्याची बॅकलिंक मुद्दामहून काढून टाकली, असा दावा कंपनीनं केला. आपण तयार केलेलं टेम्प्लेट भाजपाकडून वापरलं जात असल्याचं पाहिल्यावर कंपनीनं ही बाब पक्षाच्या लक्षात आणून दिली. याबद्दल कंपनीनं त्यांच्या वेबसाईचवर एक ब्लॉगदेखील प्रसिद्ध केला. 'भाजपा आयटी सेलनं आमचं टेम्प्लेट वापरल्यानं आम्हाला सुरुवातीला फार आनंद झाला. मात्र आमची बॅकलिंक काढून, आम्हाला कोणतंही शुल्क न देता त्यांनी टेम्प्लेटचा वापर केल्याचं नंतर आमच्या लक्षात आलं. त्यांनी आम्हाला कोणतंही क्रेडिट दिलं नव्हतं,' असं कंपनीनं ब्लॉगमध्ये म्हटलं आहे.
चौकीदाराच्या पक्षानं स्वत:च्या साईटसाठी आमचा कोड चोरला; आंध्रातील स्टार्ट-अपचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 08:54 IST