शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

चित्त्याचे भारतात पुनरागमन दिवास्वप्नच ठरणार!

By admin | Updated: January 31, 2015 01:37 IST

पृथ्वीतलावरील सर्वात वेगवान समजला जाणारा देखणा चित्ता भारतात केव्हा परतणार याची वन्यप्रेमी मोठ्या आतुरतेने प्रतीक्षा करीत

भोपाळ : पृथ्वीतलावरील सर्वात वेगवान समजला जाणारा देखणा चित्ता भारतात केव्हा परतणार याची वन्यप्रेमी मोठ्या आतुरतेने प्रतीक्षा करीत असतानाच पुरेशा निधीअभावी ही महत्त्वाकांक्षी योजना थंडबस्त्यात पडणार काय, अशी भीती निर्माण झाली आहे. देशातून अनेक वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या चित्त्याला मायभूमीत परत आणून त्याचे संवर्धन करण्याची योजना तत्कालीन संपुआ सरकारने इ. स. २०१० मध्ये आखली होती. नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या या वन्यजीवांसाठी ५००,००० डॉलर्स एवढी तरतूद करण्यात आली. मध्य प्रदेशच्या नौरादेही अभयारण्यात त्यांचा अधिवास विकसित केला जाणार होता. नामिबिया चित्ता संरक्षण फंडच्या एका पथकाने नौरादेहीचा दौरा करून चित्ते देण्यास सहमतीसुद्धा दर्शविली आहे.  मध्य प्रदेशच्या वन विभागाने यासाठी डिसेंबर २०१३ मध्ये केंद्राकडे २६४ कोटी रुपयांची मागणी केली होती; परंतु संबंधित विभागाकडून अद्याप कुठलेही उत्तर मिळाले नसल्याची माहिती राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षण (वन्यजीव) नरेंद्रकुमार यांनी शुक्रवारी येथे दिली.निधी मिळाल्यानंतरच...देशात चित्त्याचे अखेरचे दर्शन मध्य प्रदेशातच झाले होते. या शेवटच्या चित्त्याचा १९४७ मध्ये मृत्यू झाला. त्यानंतर १९५२ साली तो नामशेष प्राण्यांच्या यादीत गेला. डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेने (डब्ल्यूआयआय)२०१३ मध्ये १६.६ कोटी रुपयांच्या प्राथमिक योजनेचा आराखडा केंद्रात दिला होता. त्यानुसार एकूण ११९७ चौरस कि.मी.च्या क्षेत्रात पसरलेल्या या अभयारण्यापैकी ७०० चौ. कि.मी. क्षेत्रात चित्ता अधिवास निर्मिती करायची आहे. त्या दृष्टीने या भागात वसलेल्या २० गावांचे इतरत्र पुनर्वसन करावे लागणार आहे. येथील जवळपास २६४० कुटुंबांना नुकसानभरपाईपोटी २६४ कोटी रुपये द्यायचे आहेत. सिंह स्थलांतरण योजनेतून धडा घेऊन राज्य शासनाच्या वन विभागाने चित्ता संवर्धन योजनेसाठी केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालय तसेच राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाकडे पहिलेच निधीची मागणी केली असून हा निधी प्राप्त झाल्यानंतरच योजनचे काम पुढे सरकेल. (वृत्तसंस्था)