शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

पीएम नरेंद्र मोदींचे 'हनुमान' BJP ची साथ सोडणार? चिराग पासवान स्पष्ट बोलले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 16:22 IST

Chirag Paswan News : गेल्या अनेक दिवसांपासून चिराग पासवून NDA तून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू आहे.

Chirag Paswan : चिराग पासवान यांच्यासोबत मोठा खेला होणार. पासवान यांच्या पक्षाच्या तीन खासदारांना भाजप आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करत आहे, असा दावा आरजेडीचे आमदार मुकेश रोशन यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पार्टी(रामविलास) चे प्रमुख चिराग पासवान (Chiraj Paswan) NDA मधून फारकत घेणार असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. पण, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 'हनुमान' चिराग यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम लावला. 

शुक्रवारी(दि.30) प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना चिराग पासवान यांनी एनडीएमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ते म्हणाले की, विरोधक माझा पक्ष आणि खासदारांबाबत संभ्रम निर्माण करत आहेत. हा गोंधळ म्हणजे, 2021 मध्ये रचलेल्या कटाला खतपाणी घालण्याचा प्रयत्न आहे. चिराग पासवानला संपवता येईल असे त्यांना वाटते, पण मला तेव्हाही संपवू शकले नाहीत आणि आताही काही करू शकणार नाहीत, अशी स्पष्टोक्ती चिराग यांनी दिली.

चिराग पासवान यांचे विरोधकांवर गंभीर आरोपचिराग पासवान पुढे म्हणाले की, या लोकसभा निवडणुकीत आमच्या पक्षाने पाचही जागा जिंकल्या आहेत. ज्यांना वाटते की, आमच्या पक्षात फूट पडणार आहे, ते फक्त आपल्या इच्छाशक्तीला पंख देत आहेत. त्यांना हवे म्हणून तसे घडणार नाही. विरोधी पक्ष आमच्या सहकाऱ्यांमध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यांची इच्छा पूर्ण होणार नाही, असेही त्यांनी म्हटले.

पंतप्रधान मोदींवरील माझे प्रेम अतूट वक्फ बोर्ड सुधारणा, लॅटरल एंट्री, क्रिमी लेयर आणि अनुसूचित जातीचे उप-वर्गीकरण या मुद्द्यांवर चिराग पासवान म्हणाले की, माझे विचार नेहमीच सरकारची भूमिका प्रतिबिंबित करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील माझे प्रेम अतूट आहे. मी त्यांच्यापासून कधीही दूर जाऊ शकत नाही. जोपर्यंत ते पंतप्रधान आहेत, तोपर्यंत मी त्यांच्यासोबत असेन. आगामी निवडणुकांच्या प्रश्नावर चिराग म्हणाले की, आमचा पक्ष झारखंडसारख्या राज्यात एनडीएचा सहयोगी म्हणून निवडणूक लढवण्याच्या विरोधात नाही. आमच्या पक्षाची बिहार आणि केंद्रात भाजपसोबत युती आहे, त्यामुळे आम्ही राष्ट्रीय स्तरावर आणि आमच्या गृहराज्यात युती धर्माचे पालन करू. झारखंडमध्ये भाजप आणि एनडीएच्या इतर मित्रपक्षांना आम्हाला सोबत घ्यायचे असेल तर आम्ही तयार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :chirag paswanचिराग पासवानNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार