शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

‘आवारा हूं...’ गाण्यावर थिरकली चीनी पावले; दिल्लीत चीनी नववर्ष साजरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 05:40 IST

भारताच्या बुद्धाने चीनला बोधीसुक्तात गुंफले. दोन्ही देशांमधील आध्यात्मिक बंध तेव्हापासूनचा. बुद्धानंतर चीनी जनमानसावर मोहिनी आहे राज कपूर यांची. ‘आवारा’ राज कपूर आजही चीनी माणसाच्या स्मृतीत आहेत. चीनी नववर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात बॉलीवूडची मोठीच छाप दिसली.

- टेकचंद सोनावणे 

नवी दिल्ली : भारताच्या बुद्धाने चीनला बोधीसुक्तात गुंफले. दोन्ही देशांमधील आध्यात्मिक बंध तेव्हापासूनचा. बुद्धानंतर चीनी जनमानसावर मोहिनी आहे राज कपूर यांची. ‘आवारा’ राज कपूर आजही चीनी माणसाच्या स्मृतीत आहेत. चीनी नववर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात बॉलीवूडची मोठीच छाप दिसली. दूतावासातील चीनी कर्मचारी महिलेने ‘आँखे खुली हो या हो बंद...’ हे गीत सादर केले. गायिकेसोबत कलाकारांची पावले थिरकत होती. राज कपूर ते आमिर खानपर्यंतच्या भारत-चीन सांस्कृतिक प्रवासाची ‘मोहब्बते’ सिनेगीतांनी वाढली!दूतावासातील हिरवळीवर भव्य लाल व्यासपीठ उभारण्यात आले होते. चीनी लाल आकाश कंदिलांचा प्रकाश पसरला होता. अनेक देशांच्या दूतावासातील उच्च अधिकारी तिथे उपस्थित होते. चीनचे भारतातील राजदूत लुओ झाहुई येणाºया प्रत्येकाची विचारपूस करीत होते. परराष्ट्र सचिव विजय गोखले यांचे स्वागतही लुओ झाहुई यांनी केले. भारत-चीन सांस्कृतिक संबंधांचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. लोकेश चंद्रा कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते.चीनमध्ये बुद्धाची असंख्य रूपे आहेत. मनाची अवस्था असलेल्या बुद्धाला मानवाच्या प्रत्येक स्वभावातून चीनने साकारले. बुद्धाची विविध रूपे एकाच वेळी १० चीनी कलाकारांनी सादर केली. छोट्या रॉडवर संबंध शरीर तोलत ‘अ‍ॅक्रोबॅटिक्स’ सादर करून, चीनी कलाकारांनी अचंबित केले. चीनी कर्मचाºयाने ‘आवारा हूं...’ गाण्याची धून सेक्सोफोनवर वाजविताच, चीनी व भारतीयांनीही त्यास प्रतिसाद दिला. या प्रतिसादामुळे राजदूत लुओ सुखावले. बुद्ध व बॉलीवूडच्या मोहिनीखाली असलेल्या ड्रॅगनचे दुर्मीळ दर्शन उपस्थितांना या वेळी झाले!भारत समजून घेण्यासाठी..!बुद्ध व भारतीय कलांचा तुलनामत्क अभ्यास प्र्रा. चंद्रा यांनी केला आहे. संस्कृत, पाली, पर्शियन या भाषांचे उत्तम जाणकार असलेल्या प्रा. चंद्रा यांनी सुमारे ३६० पुस्तके लिहिली आहेत. तब्बल ३५ वर्षांपूर्वी भारताला समजून घेताना (अभ्यास करताना) मी त्यांचीच पुस्तके वाचली होती.- लुओ झाहुई, चीनचे भारतातील राजदूत

टॅग्स :New Delhiनवी दिल्ली