नवी दिल्ली : भारत-चीन सीमेवर उत्तर-पूर्व लडाखमधील चुमार भागात घुसखोरी करणारे चिनी सैनिक माघारी फिरल्याचे वृत्त आहे. त्यामुळे सीमेवर निर्माण झालेला तणाव निवळताना दिसत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातील शिखर बैठकीच्या काही तासापूर्वी चिनी सैनिकांनी आज गुरुवारी पुन्हा एकदा भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती़ पहाटेच्या सुमारास चीनचे आणखी 1क्क् वर सैनिक प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील चुमार टेकडय़ांवरून चुमार भागात शिरले होते.
अधिकृत सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार, चुमार भागात तीन ठिकाणी चीनचे सुमारे 6क्क् सैनिक दाखल झाले होत़े सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या घुसखोरीमुळे चुमार भागात तणाव निर्माण झाला होता. दोन ध्वजबैठका होऊनही चिनी सैनिकांनी मागे हटण्यास नकार दिल्याने या तणावात वाढ झाली होती. आज गुरुवारी दिवस उगवण्यापूर्वीच चीनने आपले आणखी काही सैनिक चुमार गावात पाठविल़े भारतीय जवानांनी या भागातून निघून जावे, अशा आशयाचे बॅनर त्यांच्याजवळ होत़े गत रविवारी चीनकडून भारतीय हद्दीत बांधकाम सुरू असल्याचे जवानांनी पाहिल़े यानंतर भारतीय जवानांनी हे बांधकाम रोखून धरत सीमेवरील आपली तैनाती वाढवली होती़
लेहपासून 3क्क् कि.मी. उत्तरपूव्रेकडे स्थित आणि हिमाचल प्रदेशालगतच्या चुमार भागावरून उभय देशांत ओढाताण सुरू आह़े (लोकमत न्यूज नेटवर्क)