शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

'आत्मनिर्भर भारता'त चिनी कंपनीला कसं मिळालं भुयारी मार्गाचं कंत्राट? वाचा इनसाईड स्टोरी

By कुणाल गवाणकर | Updated: January 4, 2021 17:31 IST

चिनी कंपनीला दिलेलं कंत्राट रद्द करा; स्वदेशी जागरण मंचाची मागणी

नवी दिल्ली: पूर्व लडाखमध्ये भारताविरोधात कुरघोड्या करणाऱ्या चिनी कंपन्यांना देण्यात आलेली अनेक कंत्राटं गेल्या काही महिन्यांत रद्द करण्यात आली. आत्मनिर्भर भारत अभियानाच्या अंतर्गत हीच कंत्राटं भारतीय कंपन्यांना देण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरू झाल्या. मात्र आता दिल्ली-मेरठ आरआरटीएस (RRTS) प्रकल्पाच्या अंतर्गत येणाऱ्या न्यू अशोक नगर ते साहिबाबादपर्यंतच्या ५.६ किलोमीटर भुयारी मार्गाच्या कामाचं कंत्राट चीनच्या शांघाय टनल इंजिनीयरिंग कंपनी लिमिटेडला देण्यात आलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित स्वदेश जागरण मंचनं याला विरोध करत कंत्राट रद्द करण्याची मागणी केली आहे.प्रादेशिक रेल्वे परिवहन प्रणालीला (आरआरटीएस) कार्यान्वित करणाऱ्या एनसीआरटीसीनं चिनी कंपनीला देण्यात आलेल्या कंत्राटाबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. निर्धारित प्रक्रिया आणि अटी-शर्तींनुसार कंत्राट देण्यात आल्याचं एनसीआरटीसीनं सांगितलं. मात्र एका बाजूला चीनकडून सीमेवर कुरापती सुरू असताना त्यांच्या कंपन्यांना कंत्राटं कशासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित स्वदेशी जागरण मंचानं हा विषय लावून धरला आहे. त्यामुळे सरकार अडचणीत आलं आहे.स्वदेशी जागरण मंचानं मोदी सरकारला त्यांच्याच आत्मनिर्भर भारत घोषणेची आठवण करून दिली आहे. 'आत्मनिर्भर भारत योजनेला यशस्वी करायचं असल्यास सरकारनं महत्त्वाच्या योजना, प्रकल्पांसाठी बोली लावण्यापासून चिनी कंपन्यांना रोखायला हवं. या प्रकल्पांमध्ये बोली लावण्याचा अधिकार चिनी कंपन्यांना द्यायला नको', अशी भूमिका स्वदेशी जागरण मंचानं घेतली आहे. मंचाचे राष्ट्रीय सहसंयोजक अश्वनी महाजन यांनी यासंदर्भात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संपर्क साधत चिनी कंपनीला देण्यात आलेलं कंत्राट रद्द करण्याची मागणी केली आहे.सरकारची भूमिका काय? केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, निश्चित करण्यात आलेल्या प्रक्रिया आणि अटींनुसारच हे कंत्राट देण्यात आलं. लिलाव प्रक्रियेत भारतीय कंपन्यांना पूर्ण संधी देण्यात आली होती. ९ नोव्हेंबर २०१९ रोजी न्यू अशोक नगर ते दिल्ली गाजियाबाद मेरठ आरआरटीएस कॉरिडॉरच्या साहिबाबादपर्यंत भुयार तयार करण्यासाठी बोली लावण्यास सांगितलं होतं. यासाठी पाच कंपन्यांनी निविदा भरली होती. त्यातली चिनी कंपनीची निविदा इतरांपेक्षा कमी रकमेची होती.

 

टॅग्स :chinaचीन