शहरं
Join us  
Trending Stories
1
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
2
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
3
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
4
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
5
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
6
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
7
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
8
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
9
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
10
कसा नियतीचा खेळ हा... ट्रकला धडकून मोठ्या भावाचा मृत्यू, मृतदेह घ्यायला निघालेल्या लहान भावाचाही रस्त्यावरच अंत!
11
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
12
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
13
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
14
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
15
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
16
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
17
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
18
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास
19
सौरभ चौघुलेपासून विभक्त झाल्याच्या चर्चांवर अखेर योगिता चव्हाणनं सोडलं मौन, म्हणाली...
20
रश्मिका मंदानाला व्हायचंय आई, आतापासूनच पडली प्रेमात; म्हणाली, "ठराविक वयात..."

कोलकात्यात चायनाटाऊनचा व्यवसाय निम्म्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 06:03 IST

कोरोनामुळे खवय्ये धास्तावले; चायनीज हॉटेलमध्ये पाय ठेवण्यास नकार

कोलकाता : सुक्याबरोबर ओलेही जळते, असा प्रकार कोरोनाच्या साथीमुळे काही ठिकाणी झाला आहे. चीन व जगातील काही देशांमध्ये फैलाव झालेल्या या साथीचा कोलकातातील खवय्यांनीही धसका घेतला. देशातील सर्वात मोठे चायनाटाऊन कोलकात्यापाशी तांगरा येथे असून, तेथील चायनीज हॉटेलमध्ये जाण्यासाठी लोक आता घाबरत आहेत. त्यामुळे तेथील चिनी लोकांचा व्यवसाय गेल्या काही दिवसांत ५० ते ६० टक्क्यांनी कमी झाला आहे.तांगरा येथे बनविले जाणारे चिनी पदार्थ साऱ्या देशातील खवय्यांच्या याआधीच पसंतीस उतरले आहेत. या भागात अजून एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेला नाही. कोरोनाने जिथे तांडव मांडले आहे, ते चीनमधील वुहान शहर तांगरापासून २७०० कि.मी. दूर आहे. तांगराच्या चायनाटाऊनचा वुहानसह चीनशी काहीही संबंध उरलेला नाही.

अनेक दशकांपासून या भागात वास्तव्य करून असलेल्या चिनी लोकांच्या मालकीची तिथे सुमारे ४० पेक्षा जास्त छोटी-मोठी हॉटेल आहेत. तिथे किमान २५०० चिनी लोक राहतात तर कोलकातातील तिरेटा बाजार येथे सुमारे २ हजार चिनी लोक राहतात. कोलकातातील चिनी आता भारतीय नागरिक आहेत. या चिनी लोकांच्या युवा पिढीत अनेकजण कॅनडा, आॅस्ट्रेलिया, स्वीडन, अमेरिका आदी देशांत स्थायिक झाले आहेत. चीनमधील खाद्यपदार्थांतूनच कोरोनाची लागण झाल्याचा संशय असल्याने तांगरा येथील चिनी लोकांच्या खाद्यपदार्थांकडे लोक सध्या फारसे फिरकत नाहीत. त्यामुळे गेल्या आठवड्याच्या अखेरीस तांगरामध्ये काही हॉटेलांमध्ये तर शुकशुकाट होता. काही लाख रुपयांचा तोटातांगरा येथे शून ली हे छोटेसे हॉटेल चालविणाºया मॅथ्यू चेन या चिनी व्यक्तीने सांगितले की, आमच्या हॉटेलमध्ये १ फेब्रुवारीला ८१ ग्राहक आले होते. त्यानंतर ८ फेब्रुवारीला ही संख्या ४३ पर्यंत खाली घसरली. त्यामुळे व्यवसायामध्ये एका दिवसात आम्हाला १७ हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागला. तेथील बिग बॉस, किम लिंग या मोठ्या हॉटेलांमध्ये गेल्या शनिवारी एक हजारपेक्षा ग्राहक आले होते. मात्र ते इतर वेळेपेक्षा संख्येने कमीच होते. या हॉटेलना सुमारे ४ लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला. 

टॅग्स :corona virusकोरोनाchinese dragonचिनी ड्रॅगनfoodअन्न