शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

Bharat Jodo Yatra: २ हजार किमी भूभागावर चीनचा कब्जा, सैनिक, लडाखमधील नागरिकांचे म्हणणे ऐका - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 07:35 IST

Bharat Jodo Yatra: मी सेवानिवृत्त सैनिक आणि लडाखमधील नागरिकांना भेटल्यानंतर ते म्हणाले की, चीनने आपली २ हजार किलोमीटर जमीन घेतली आहे. भारतातील अनेक गस्ती चौक्या चीनने बळकावल्या आहेत.

श्रीनगर : मी सेवानिवृत्त सैनिक आणि लडाखमधील नागरिकांना भेटल्यानंतर ते म्हणाले की, चीनने आपली २ हजार किलोमीटर जमीन घेतली आहे. भारतातील अनेक गस्ती चौक्या चीनने बळकावल्या आहेत. सरकारने येथील नागरिकांचे म्हणणे नाकारणे अतिशय धोकादायक आहे. त्यामुळे चीनचा आत्मविश्वास वाढेल, असे मत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे.

जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा प्रदान करणे तसेच तिथे लोकशाही प्रक्रिया पुन्हा सुरू करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने सरकारने पहिले पाऊल उचलायला हवे, असे राहुल यांनी सांगितले.

लाल चौकात गांधी यांनी तिरंगा ध्वज फडकाविला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांना सांगितले की, प्रेम, आपुलकी, दुसऱ्याचे म्हणणे ऐकून घेणे या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्याबाबतीत भूतकाळात ज्या गोष्टी झाल्या त्याबद्दल मी आता काही भाष्य करणार नाही. मला भविष्यकाळाचे वेध लागले आहेत.

भारत जोडोच्या प्रवासात खूप काही शिकायला मिळाले. लोकांना एकत्र आणणे, द्वेष संपवणे, हे यात्रेचे ध्येय होते. लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम अनुभव आहे... प्रवास इथेच संपत नाही, तर ती पहिली पायरी आहे, ही सुरुवात आहे.- राहुल गांधी, काँग्रेस खासदार

‘घरी आल्यासारखे वाटले’ राहुल गांधी म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधील शेतकरी, व्यावसायिक, विद्यार्थी, युवक अशा सर्वांची मी भेट घेतली. त्यापैकी कोणीही काश्मीरमधील सध्याच्या स्थितीबद्दल समाधानी नाही. आमचे घराणे मूळचे काश्मीरचे आहे. त्यामुळे भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून काश्मीरमध्ये येताना मला विलक्षण आनंद झाला. आपल्या घरी आल्यासारखे वाटले. 

३७० कलम...३७० कलम रद्द करण्याबाबतच्या प्रश्नावर राहुल म्हणाले की, याबाबत काँग्रेसने आपली भूमिका याआधीच स्पष्ट केली आहे. त्यांनी सांगितले की, काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा द्यायला हवा. लोकशाही प्रक्रिया सुरू होणे हा तेथील जनतेचा मूलभूूत अधिकार आहे.

काश्मीरमध्ये निरपराध लोकांच्या हत्याराहुल  म्हणाले की, काश्मीरमध्ये अद्यापही निरपराध लोकांच्या हत्या सुरू असून, बॉम्बस्फोट घडविले जात आहेत. त्यामुळे काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्थेच्या स्थितीत सुधारणा झाल्याचा भाजपचा दावा फोल आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राJammu Kashmirजम्मू-काश्मीर