शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

चीनचे दूध व उत्पादनांवर आणखी चार महिने बंदी; केंद्राचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 06:50 IST

सरकारने चीनचे दूध आणि चॉकलेट्सह दुधापासूनच्या इतर उत्पादनांच्या आयातीवर २३ एप्रिल, २०१९ पर्यंत बंदी वाढवली आहे.

नवी दिल्ली : सरकारने चीनचे दूध आणि चॉकलेट्सह दुधापासूनच्या इतर उत्पादनांच्या आयातीवर २३ एप्रिल, २०१९ पर्यंत बंदी वाढवली आहे. वाणिज्य मंत्रालयाने सोमवारी प्रसिद्धीस दिलेल्या अधिसूचनेत ही माहिती दिली आहे.चीनमधील ‘दूध, दुधाच्या उत्पादनांवर (चॉकलेट्स, चॉकलेटसची उत्पादने, कँडीजसह दूध आणि दुधाच्या भुकटीचा घटकम्हणून वापर असलेली) आणखीचार महिन्यांसाठी (२३ एप्रिल,२०१९) किंवा पुढील आदेशापर्यंतबंदी वाढवण्यात आली आहे, असे विदेश व्यापार महासंचालकांनी (डीजीएफटी) निवेदनात म्हटले.ही बंदी पहिल्यांदा सप्टेंबर २००८ मध्ये घालण्यात आली होती व नंतर ती वेळोवेळी वाढवण्यात आली. शेवटच्या बंदीची मुदत २३ डिसेंबर रोजी संपली. डीजीएफटी हा वाणिज्य मंत्रालयाचा भाग असून तो देशातील आयात व निर्यातीशी संबंधित कामे पाहतो.चीनकडून जी निर्यात भारतातहोते त्यातील दुधाच्या काही पदार्थांत मेलामाईन असावे, या भीतीतूनबंदी घालण्यात आली आहे. मेलामाईन हे विषारी रसायन प्लास्टिक्स आणि खते निर्मितीत वापरले जाते. भारत चीनकडूनदूध आणि दुधाचे पदार्थ आयातकरीत नाही तरीही प्रतिबंधात्मकउपाय म्हणून ही बंदी घालण्यात आली आहे.भारत हा दूधाचा जगातील सर्वात मोठा उत्पादक आणि उपभोक्ता आहे. भारतात वर्षाला सुमारे १५० दशलक्ष टन दुधाचे उत्पादन होते. उत्तर प्रदेश हा दूध उत्पादनात आघाडीवर असून त्यानंतर राजस्थान व गुजरातचा क्रमांक आहे.भारतावर परिणाम होण्याची शक्यता नाहीच्चीनमधील दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या आयातीवरील बंदीला मुदतवाढ दिली असली तरी त्याचा परिणाम देशावर होण्याची अजिबात शक्यता नाही.च्मुळात चीन हा दूध वा दुग्धजन्य पदार्थांसाठी प्रसिद्ध देश नाही.त्यामुळे तेथून ते पदार्थ आयात न केल्याचा भारतावर परिणाम होण्याची शक्यता नाही, असे अधिकाल्याने सांगितले.

टॅग्स :Indiaभारत