शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
3
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
4
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
5
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
6
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
7
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
8
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
9
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
10
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
11
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
12
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
13
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
14
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
15
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
16
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
17
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

लद्दाखमध्ये पुन्हा चीनची घुसखोरी

By admin | Updated: March 13, 2016 05:08 IST

चीनच्या सैनिकांनी लद्दाख क्षेत्रात पुन्हा एकदा घुसखोरी केली. हे सैनिक सीमा ओलांडून पानगोंग तलावाजवळ भारतीय हद्दीत सुमारे ६ किमी आत घुसले होते.

लेह : चीनच्या सैनिकांनी लद्दाख क्षेत्रात पुन्हा एकदा घुसखोरी केली. हे सैनिक सीमा ओलांडून पानगोंग तलावाजवळ भारतीय हद्दीत सुमारे ६ किमी आत घुसले होते. परंतु, भारत-तिबेट सीमा पोलिसांनी (आयटीबीपी) त्यांना दोन तासांच्या आत माघारी पाठविले.संरक्षण विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गेल्या ८ मार्चची आहे. या दिवशी पीपल्स लिबरेशन आर्र्मीचे (पीएलए) ११ सैनिक पानगोंगजवळ फिंगर-८ आणि सिरजाप-१मध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून (एलएसी) भारतीय हद्दीत दाखल झाले होते. त्यांचे नेतृत्व कर्नल स्तरावरील एक अधिकारी करीत होता. चीनचे सैनिक चार गाड्यांमधून भारताच्या ठाकुंच सुरक्षा चौकीत आले आणि भारतात ५.५ किमी आतपर्यंत पोहोचले. चिनी सैनिकांच्या या समूहाचा सामना गस्तीवर असलेल्या इंडो-तिबेटियन बॉर्डर (आयटीबीपी) पोलिसांशी झाला. त्यांनी चिनी सैनिकांना बॅनर दाखवून माघारी जाण्याचे आवाहन केले. तब्बल दोन तास चाललेल्या शाब्दिक बाचाबाचीनंतर अखेर घुसखोरी करणाऱ्या चिनी सैनिकांना परत जावे लागले. गैरसमजुतीतून अनेकदा अशा घटना घडतात असे त्यांचे म्हणणे होते. (वृत्तसंस्था)चिनी सैनिक होते शस्त्रसज्जभारतीय हद्दीत घुसणारे हे चिनी सैनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज होते आणि आयटीबीपीच्या जवानांजवळही शस्त्रे होती. भारत-चीन सैनिकांदरम्यान यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. मे २०१३मध्ये भारत आणि चीनदरम्यान ३ आठवड्यांच्या संघर्षापासून ९० किमीच्या पानगोंग तलाव परिसरात तणावपूर्ण वातावरण असते.