शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

चीनकडून कुठल्याही युद्धाची तयारी नाही, भारताने केले स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 09:15 IST

लडाख ते अरुणाचलप्रदेशपर्यंतच्या पट्ट्यामध्ये नियंत्रण रेषेजवळ चीनकडून मोठया प्रमाणावर सैन्य तैनाती सुरु असल्याचे वृत्त भारताने फेटाळून लावले आहे

 ऑनलाइन लोकमत 

बिजींग, दि. 20 - लडाख ते अरुणाचलप्रदेशपर्यंतच्या पट्ट्यामध्ये नियंत्रण रेषेजवळ चीनकडून मोठया प्रमाणावर सैन्य तैनाती सुरु असल्याचे वृत्त भारताने फेटाळून लावले आहे तसेच तिबेटमध्ये चिनी लष्कर कोणताही युद्ध सराव करत नसल्याचे भारतीय सूत्रांनी म्हटले आहे. चीन तिबेटच्या डोंगराळ भागात हजारो टनांची लष्करी सामुग्री पाठवून  युद्धाची तयारी करत आहे असे वृत्त बुधवारी चिनी प्रसारमाध्यमांनी दिले होते. त्यापार्श्वभूमीवर भारताने चीनकडून अशा कोणत्याही हालचाली होत नसल्याचे स्पष्ट केले आहे.
 
अशा प्रकारचे वृत्तांकन हा चीनच्याच रणनितीचा एक भाग आहे. सिक्कीमजवळच्या डोकलाममधून भारतीय सैन्याने माघार घ्यावी यासाठी दबाव वाढवण्याच्या रणनितीचा हा एक भाग आहे. डोकलाममध्ये चीनला रस्ते बांधण्यापासून रोखल्यापासून भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला आहे. मागच्या महिन्याभरापासून दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर उभे ठाकले आहे. चीनच्या तिबेटमधल्या युद्धसरावावर फार चर्चा झाली असली तरी, त्यात फार काही विशेष नाही. 
 
ल्हासामध्ये झालेल्या कवायती या नियमित वार्षित सरावाचा एक भाग होत्या. जूनच्या सुरुवातीला हा सराव झाला होता. सर्व देशांची लष्करे काही महिन्यांच्या अंतराने असे सराव करत असतात त्यात विशेष असे काही नाही. तिबेटमध्ये चीन 2009 पासून अशा प्रकारचा सराव करत आहे असे भारतीय सूत्रांनी सांगितले. 
 
आणखी वाचा 
 
चीन तिबेटच्या डोंगराळ भागात हजारो टनांची लष्करी सामुग्री पाठवत असल्याचे वृत्त काल चिनी माध्यमांनी दिले होते.  पश्चिम थिएटर कमांडने उत्तर तिबेटच्या कुनलून पर्वतरांगामध्ये हजारो टनांची सैन्य सामुग्री पाठवली आहे. पश्चिम थिएटर कमांडकडे शिनजियांग आणि तिबेटवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असून हीच कमांड भारताबरोबरचे सीमा विषय हाताळते. चीनकडे यादोंगपासून ल्हासापर्यंत पसरलेल्या रेल्वे आणि रस्ते नेटवर्कच्या माध्यमातून लष्करी सामुग्री सिक्कीमच्या नाथू -ला पर्यंत पोहोचवण्याची क्षमता आहे. चीनी सैन्याला एक्सप्रेस वे नेटवर्कच्या माध्यमातून 700 किलोमीटरचे हे अंतर कापण्यासाठी फक्त सहा ते सात लागू शकतात. 
तिढा वाढला! भारतापाठोपाठ चीननेही डोकलाममध्ये ठोकले तंबू
ग्लोबल टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या सरावात पिपल्स लिबरेशन आर्मीच्या तिबेट मिलिट्री कमांड आणि चीनच्या पठार डोंगराळ भागात तैनात असणा-या ब्रिगेडने भाग घेतला. पिपल्स लिबरेशन आर्मी तिबेटमधील भारत - चीन सीमारेषेवर तैनात असते. तिबेटला जोडण-या डोंगराळ भागांमध्ये हे सैन्य तैनात असतं. सीसीटीव्ही वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, हे सैन्य गेल्या खूप दिवसांपासून ब्रम्हपुत्र नदीच्या मध्य आणि खालील भागात तैनात आहे. 
 
चीनी सैनिकांनी केलेल्या सराव अभ्यासात हल्ल्यादरम्यान कशाप्रकारे इतर तुकड्या एकत्रित येऊन उत्तर देतील याचा अभ्यास करण्यात आला. यासंबंधीचा एक व्हिडीओ ऑनलाइन पोस्ट करण्यात आला आहे ज्यामध्ये ग्रेनेड आणि मिसाईलचा वापर करण्यात आल्याचं दाखवण्यात आलं.
 या व्हिडीओमध्ये कशाप्रकारे रडार युनिटच्या सहाय्याने शत्रुच्या विमानाचा पत्ता लावला जाऊ शकतो, आणि सैनिक ते नेस्तनाभूत करु शकतात हेदेखील दाखवण्यात आलं. जवळपास 11 तासाहून जास्त वेळ हा सराव अभ्यास चालू होता.