शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

चिनी ड्रॅगन वठणीवर आला; संपूर्ण जम्मू-काश्मीर अन् अरुणाचल प्रदेश भारताच्या नकाशात दाखवला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 11:02 IST

चीननं आता एका नकाशामध्ये पूर्ण जम्मू-काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश हा भारताचाच अविभाज्य भाग असल्याचं दाखवलं आहे.

नवी दिल्लीः बऱ्याचदा अरुणाचल प्रदेशवर दावा करणाऱ्या चीननं आता एका नकाशामध्ये पूर्ण जम्मू-काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश हा भारताचाच अविभाज्य भाग असल्याचं दाखवलं आहे. बीजिंगच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (BRI)च्या दुसऱ्या समीटमध्ये चीननं हा नकाशा प्रदर्शित केला आहे. या नकाशामध्ये चीननं पूर्ण जम्मू-काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशला भारताचा भाग दाखवला आहे. या नकाशामध्ये भारताला BRIचा एक भाग दाखवण्यात आले आहे.भारतानं या समीटवर बहिष्कार घातला आहे. तत्पूर्वी 2017मध्येही भारत BRIच्या पहिल्या समीटमध्ये सहभागी झालेला नव्हता. या समीटमध्ये 37 देशांचा सहभाग आहे. BRI या प्रकल्पाचा उद्देश राज्यमार्ग, रेल्वे लाइन, बंदर आणि समुद्री मार्गाच्या माध्यमातून आशिया, आफ्रिका आणि युरोपला जोडण्याचा आहे. तीन दिवस चालणाऱ्या या समीटची सुरुवात गुरुवारी झाली आहे. हा नकाशा चीनच्या कॉमर्स मिनिस्ट्रीनं प्रदर्शित केला आहे. पूर्ण जम्मू-काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशला भारताचा हिस्सा दाखवल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. कारण गेल्या काही दिवसांपूर्वीच चीननं अरुणाचल प्रदेश हा भारताचा भाग असलेले हजारो नकाशे नष्ट केले होते. चीननं उचललेल्या या पावलामुळे तज्ज्ञही बुचकळ्यात पडले आहेत.

पूर्ण जम्मू-काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशला भारताचा हिस्सा दाखवून भारताला खूश करण्याची चीननं ही चाल तर नाही ना, असा प्रश्नही जाणकारांना सतावतो आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये चीनचे सरकारी चॅनेल CGTNने पाकिस्तानच्या नकाशातून पाकव्याप्त काश्मीरही वेगळं दाखवलं होतं.
पाकव्याप्त काश्मीरला पाकिस्तानच्या नकाशातून बाहेर दाखवल्यानं त्याचा परिणाम चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोरवरही होण्याची शक्यता आहे. भारतानं या प्रकल्पाला पाकव्याप्त काश्मीरमधून नेण्यास आधीच विरोध दर्शवला आहे. चीननं पाकव्याप्त काश्मीरमधल्या मूलभूत सुविधांवर मोठी गुंतवणूक केली आहे. परंतु भारतानं प्रोजेक्टवर नाराजी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीchinaचीन