शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या स्वागतासाठी चीन उत्सुक; ७ वर्षांनी देणार भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 06:21 IST

इकडे रशियासोबत लष्करी, सामरिक प्रकल्पांवर चर्चा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चीन दौरा उभय देशांमधील संबंध अधिक मजबूत करेल, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) तियानजिन शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी सहभागी होण्याची शक्यता आहे. चीनने त्यांच्या स्वागताची तयारी चालविली आहे.

पंतप्रधान मोदी चीनला जाण्यापूर्वी २९ ऑगस्ट रोजी जपानलाही भेट देऊ शकतात. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनीही एससीओ बैठकांसाठी काही दिवसांपूर्वी चीनचा दौरा केला आहे.

पंतप्रधान मोदी सात वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर चीनला भेट देणार आहेत. यापूर्वी त्यांनी २०१८ मध्ये चीनचा दौरा केला होता. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी सांगितले की, एससीओ परिषदेत २० हून अधिक देशांचे नेते सहभागी होणार आहेत.

इकडे रशियासोबत लष्करी, सामरिक प्रकल्पांवर चर्चा

मॉस्को : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी रशियाचे पहिले उपपंतप्रधान डेनिस मंटुरोव्ह यांची मॉस्को येथे भेट घेतली. या भेटीत दोन्ही देशांमधील लष्करी आणि तांत्रिक संबंधांवर तसेच सामरिक क्षेत्रांमधील संयुक्त प्रकल्पांवर चर्चा झाली. डोवाल यांनी गुरुवारी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचीही भेट घेतली होती. बाहेरच्या दबावानंतरही रशियासोबत सर्व आघाड्यांवर सहकार्य सुरू ठेवण्याची भारताची वचनबद्धता डोवाल यांनी यावेळी व्यक्त केली. अमेरिकेने  भारतावर अतिरिक्त २५ टक्के शुल्क लावल्यानंतर डोवाल यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

द्विपक्षीय सहकार्यावर भर : डोवाल आणि मंटुरोव्ह यांच्या चर्चेत लष्करी-तांत्रिक सहकार्याबरोबरच नागरी विमान उत्पादन, धातू विज्ञान आणि रसायन उद्योगांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांतील संयुक्त प्रकल्पांवरही लक्ष केंद्रित करण्यात आले.

पुतीन यांना निमंत्रण : डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावतीने राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना भारत भेटीचे निमंत्रण दिले ते पुतीन यांनी स्वीकारले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीchinaचीनXi Jinpingशी जिनपिंग