शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

मुलाचे मानसिक आरोग्य सर्वांत महत्त्वाचे..! उच्च न्यायालयाने आजोबांचा भेटीचा अर्ज फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 14:09 IST

न्यायमूर्ती रवींद्र मैथानी आणि न्यायमूर्ती आलोक महारा यांच्या खंडपीठाने फेटाळले अपील

नैनीताल: नातवाच्या कस्टडीसाठी दाखल केलेली आजोबांची याचिका उत्तराखंड उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. अशा प्रकरणांमध्ये अल्पवयीन मुलाचे मानसिक आरोग्य आणि त्याची इच्छा हाच सर्वांत महत्त्वाचा घटक असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. न्यायमूर्ती रवींद्र मैथानी आणि न्यायमूर्ती आलोक महारा यांच्या खंडपीठाने गजेन्द्रसिंह यांनी दाखल केलेले अपील फेटाळत म्हटले की, त्यांचा नातू अक्षत हा त्याची आई शिवानीच्या देखरेखीखालीच राहील.

गजेन्द्रसिंह यांनी आपल्या नातवाची कस्टडी स्वतःकडे देण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. मात्र, २०२३ मध्ये डेहरादूनच्या विकासनगर येथील कुटुंब न्यायालयाने ती याचिका फेटाळली. त्याविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात अपील केले होते. त्यांच्या मते, कुटुंब न्यायालयाने केवळ पाच वर्षांच्या मुलाच्या जबाबावर अवलंबून राहून निर्णय दिला.

आजोबांचा दावा काय?

गजेन्द्रसिंह यांनी असा दावा केला की मुलगा ‘पॅरेंटल एलिएनेशन सिंड्रोम’ने प्रभावित झाला आहे. म्हणजेच आईने त्याच्या मनात आजी-आजोबांविषयी नकारात्मक भावना निर्माण केल्या आहेत. मात्र, मुलाच्या आईने न्यायालयात सांगितले की, दोन समुपदेशन सत्रांदरम्यान मुलाने स्पष्टपणे तिच्याबरोबर राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. समुपदेशन अहवालात अक्षतने म्हटले होते, “आई माझी चांगली काळजी घेते, मी तिच्यासोबत आनंदी आहे आणि मला आजोबांना भेटायचे नाही.”

न्यायालयाने कोणते निरीक्षण नोंदवले?

कुटुंब न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत उच्च न्यायालयाने म्हटले की, मुलगा आजोबांना भेटण्यासही कचरत होता. त्यामुळे त्याला जबरदस्तीने भेटायला भाग पाडणे हे त्याच्या हिताचे ठरणार नाही. मुलाचे कल्याण आणि मानसिक शांतता सर्वांत महत्त्वाची आहे. मुलाच्या इच्छेविरुद्ध कस्टडी देणे किंवा भेटीचा अधिकार देणे हे नैतिक आणि व्यवहार्य दोन्ही दृष्टिकोनांत अयोग्य आहे.” त्यामुळे न्यायालयाने आदेश दिला की अक्षत त्याच्या आईच्या संरक्षणाखालीच राहील.

English
हिंदी सारांश
Web Title : Child's mental health paramount: High Court rejects grandfather's visitation plea.

Web Summary : Uttarakhand High Court denied a grandfather's custody plea, prioritizing the child's mental well-being. The court noted the child's reluctance to meet his grandfather and affirmed the importance of the child's wish to stay with his mother.
टॅग्स :Courtन्यायालय