शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

चंदीगडच्या 'त्या' मुलाला गुगलची ऑफर नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2017 12:12 IST

चंदीगड, दि. 2- चंदीगडच्या हर्षित शर्मा या 16 वर्षाच्या मुलाला  गुगलने वार्षिक १ कोटी ४४ लाख रुपयांच्या पगाराच्या नोकरीची ऑफर दिल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरला झाली. मंगळवारी या तरूणाचीच सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळाली. पण टाइम्स ऑफ इंडियाने जेव्हा गुगलशी संपर्क साधला तेव्हा अशी कोणतीही ऑफर त्या मुलाला दिली नसल्याचा ...

ठळक मुद्देचंदीगडच्या हर्षित शर्मा या 16 वर्षाच्या मुलाला  गुगलने वार्षिक १ कोटी ४४ लाख रुपयांच्या पगाराच्या नोकरीची ऑफर दिल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरला झालीगुगलशी संपर्क साधला तेव्हा अशी कोणतीही ऑफर त्या मुलाला दिली नसल्याचा खुलासा गुगलने केला आहे  'आमच्याकडे सध्या तरी हर्षित शर्माला नोकरीची ऑफर दिल्याची कोणतीही माहिती नाही.' असं गुगलच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे. 

चंदीगड, दि. 2- चंदीगडच्या हर्षित शर्मा या 16 वर्षाच्या मुलाला  गुगलने वार्षिक १ कोटी ४४ लाख रुपयांच्या पगाराच्या नोकरीची ऑफर दिल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरला झाली. मंगळवारी या तरूणाचीच सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळाली. पण टाइम्स ऑफ इंडियाने जेव्हा गुगलशी संपर्क साधला तेव्हा अशी कोणतीही ऑफर त्या मुलाला दिली नसल्याचा खुलासा गुगलने केला आहे.  'आमच्याकडे सध्या तरी हर्षित शर्माला नोकरीची ऑफर दिल्याची कोणतीही माहिती नाही.' असं गुगलच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे.  हर्षित ज्या शाळेत शिकतो त्या गव्हर्नमेंट मॉडेल सिनिअर सेकंडरीच्या एका अधिकाऱ्याने हर्षितला गुगलची जॉब ऑफर मिळाल्याची माहिती दिल्यावर ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली.'हर्षिद शर्मा हा मुलगा आमच्या शाळेतून यंदाच्याच वर्षी उत्तीर्ण होऊन बाहेर पडला आहे. त्यानेच स्वत: शाळेत येऊन ही माहिती दिली. त्याने व्हॉट्स अॅपवर ऑफर लेटरही पाठवलं होतं, पण ते नंतर माझ्याकडून डीलीट झालं. ते पत्र मिळताच मी तुम्हाला देईन, अस शाळेच्या मुख्याध्यापिका इंद्रा बेनीवाल यांनी सांगितलं आहे. पण आता हर्षित शर्मा या मुलाला कोणतीही ऑफर दिल्याची कोणतीही माहिती नसल्याचं गुगलने स्पष्ट केलं आहे.  विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झालेला हर्षित एक सामान्य मुलगा आहे. यापूर्वी डिजीटल इंडिया मोहिमेत हर्षितला ७ हजार रुपयांचं बक्षीस मिळालं होतं, असं मुख्याध्यापकांनी सांगितलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने त्या मुलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्याच फोन बंद आहे. सुत्रांच्या माहितीनुसार,  गुगल शालेय विद्यार्थ्यांना कधीच नोकरी देत नाही.

नेमकं प्रकरण काय ?चंदीगड येथे राहणाऱ्या हर्षितने सरकारी मॉडल सीनियर सेकेंडरी स्कूलमधून यावर्षी बारावीची परीक्षा दिली. ऑगस्टमध्ये तो ट्रेनिंगसाठी अमेरिकेला जाणार आहे. इंटरनेट जायंट गूगलने हर्ष‍ित शर्मा आयकॉन डिजाइनिंगसाठी सिलेक्ट केलं आहे.  आणि गूगलच्या या स्पेशल प्रोग्रामसाठी हर्ष‍ित एक वर्षाची ट्रेनिंग दिली जाईल. ट्रेनिंग दरम्यान त्याला प्रत्येक महिन्याला चार लाख रुपये पगार दिला जाणार आहे. ट्रेनिंग पूर्ण होताच हर्ष‍ितचा पगार 12 लाख रुपये प्रति महिना असेल, अशी माहिती समोर आली होती. गुगलने जॉबची ऑफर दिल्यानंतर मला पहिल्यांदा विश्वास बसला नाही. माझी 12 वी ची परिक्षा झाल्यानंतर मी ऑनलाइन जॉब सर्च करत होतो. मे मध्ये मी गुगलच्या पदासाठी अप्लाय केलं होतं. त्याचवेळी मी ऑनलाइन मुलाखतही दिली. गेल्या दहा वर्षापासून मला ग्राफिक्स डिजाइनिंगमध्ये आवड होती. मुलाखतीनंतर ज्यावेळी त्यांनी माझ्या कामाबातचा डाटा मागवला त्यावेळी मी जे पोस्टर डिझाईन केलं ते त्यांना पाठवलं होतं. त्यावरच मला ही संधी मिळाली आहे. गूगलने ऑगस्टमध्ये ज्वॉइन करण्यास सांगितलं आहे, अशी माहिती हर्षितने माध्यमांशी बोलताना दिली होती.